Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बापासह दोघांनी केला १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार; मुलीने दिला मुलाला जन्म

बापासह दोघांनी केला १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार; मुलीने दिला मुलाला जन्म

Related Story

- Advertisement -

बापासह दोघा नराधमांनी १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने मुलाला जन्म दिल्याने तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेखा नगर झोपड्पट्टी येथील १४ वर्षीय मुलीवर तिच्या बाप व इतर दोघांनी वारंवार बलात्कार केला. तिला बाहेर वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तिला मुलाला जन्म दिला असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अंबड पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीनुसार तिचे वडील व संशयित अरबाज शेख व गिरणीवाला उत्तम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -