वडाळ्याच्या विठू माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

Mumbai

मुंबईतील वडाळा येथील प्रतिपंढरपूर म्हणून मानलं जाणारं विठ्ठल मंदिर कार्तिकी एकादशीनिमित्त सजवण्यात आलं आहे. ज्या भाविकांना पंढरपूरात जाऊन माऊलींचं दर्शन घेता येत नाही अशा भाविकांसाठी हे विठ्ठल मंदिर खुलं करण्यात आलं आहे. विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी पाहायला मिळतेय