विधानभवनात सत्ताधारी-विरोधक एकत्र

विधानभवन परिसरामध्ये आज मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आदी अनेक सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षातील आमदार, विरोधी पक्षनेते आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी देखील ग्रंथदिंडी खंद्यावर घेतली.