श्रमजीवी संघटनेचे अन्नसत्याग्रह आंदोलन

MUMBAI

गेल्या पाच दिवसांपासून शांततेत कायदा पाळत सुरू असलेले श्रमजीवी संघटनेच्या हक्काग्रह हे आंदोलन आता तीव्र झाले आहे. सरकारच्या असंवेदनशील भूमिकेविरोधात आता विवेक पंडित यांनी अन्नसत्याग्रह हे राष्ट्रपिता महात्मा गांधीजींनी दिलेले आयुध वापरत घोडबंदर येथे महामार्गावरच शेकडो आदिवासींसोबत ठाण मांडले आहे. माजी आमदार आणि श्रमजीवी संघटनेचे प्रमुख विवेक पंडित यांच्यासोबत श्रमजीवीच्या संस्थापिका विद्युल्लता पंडित आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा या तिघांनी अन्नत्सत्याग्रह सुरू केले आहे.