शर्मिला ठाकरे घेणार उपमुख्यमंत्र्यांची भेट

Mumbai

बाई जेरबाई वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचारी आज १३ जानेवारीपासून तीन दिवस धरणे आंदोलन करत आहेत. लाल बावटा जनरल कामगार युनियनकडून हे धरणे आंदोलन केलं जात आहे. हॉस्पिटलला अनुदान नसल्याने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बंद केले आहे. त्याचबरोबर वाडिया हॉस्पिटलचे खासगीकरण थांबावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी मनसे नेत्या शर्मिली ठाकरे यांनी आंदोलनात सहभाग घेतला आणि लवकरच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here