ठाण्यातल्या ट्रॅफिकवर उपाय काय? पालिका आयुक्त म्हणतात…

एकीकडे कोरोनाच्या समस्येवर ठाणेकरांनी जोरकसपणे लढा सुरू ठेवला असताना दुसरीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून ठाणेकरांना सतावत असलेल्या ट्रॅफिकच्या समस्येवर मात्र अजूनही ठाणेकरांना उपाय शोधता आलेला नाही. जसं हे प्रशासनाचं अपयश आहे, तसंच ते बेशिस्तपणे वाहतूक करणाऱ्या काही ठाणेकरांचं देखील आहे. मात्र, या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणत्या पद्धतीने ठाण्यातल्या ट्रॅफिकच्या समस्येवर उपाय शोधता येईल, याविषयी माय महानगरच्या खुल्लम खुल्ला या विशेष कार्यक्रमात ठाण्याचे पालिका आयुक्त विपीन शर्मा यांना विचारणा केली असता त्यांनी त्यासाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे कॅमेऱ्यासमोर मांडले.