शाब्बास BMC…केवळ एका महिन्यात अंमलबजावणी

मुंबई महापालिकेने महिलांना समान अधिकार आहेत, हे दाखवण्यास अक्षरश: रस्त्यावरुन सुरुवात केली आहे. रस्त्यावरील मार्गदर्शक खूणा आणि पादचाऱ्यांसाठी असलेल्या सिग्नवरील पुरुषांची मक्तेदारी आता मोडून सिग्नलवरील पुरुषांच्याऐवजी महिलांचे चित्र लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे अनलॉकनंतर सर्वच नागरिकांना हा सर्वात मोठा बदल अनुभवता आला आहे.