गाढवासारखे घोड्यावरही लादले वजन

MUMBAI

लॉकडाऊनच्या काळात माथेरानमध्ये शेकडो घोड्यांच्या पाठीवरून जीवघेण्या ओझ्याची वाहतूक केली जात आहे. एका घोड्याच्या पाठीवर पाच-पाच गॅस सिलेंडर सह इतर ओझे ठेवून त्यांना माथेरानचा डोंगर चढवला जात आहे. या गैरवर्तनाबद्दल घोड्यांच्या मालकांवर कारवाई केली जावी, अशी मागणी पशुप्रेमी संस्थांनी केली आहे. माथेरानच्या डोंगरावर शेकडो कुटुंब राहतात. त्यांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी डोंगरावरून खाली-वर ये-जा करावी लागते. त्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. तसेच मिनी ट्रेन मधून प्रवास केला जातो. मात्र, पर्यटकांअभावी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे मिनी ट्रेनही बंद आहे. जीवनावश्यक वस्तू डोंगराखालून वर नेण्यासाठी घोड्यांच्या पाठीवर वजन लादले जाते. यावेळी घोड्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.