पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण एका देशी दारूच्या दुकानात जाऊन संबंधित व्यक्तीला लुटले आहे. त्यांनी २२ हजार रुपयांचा ऐवज लुटला असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात आरोपींनी काउंटरवर असलेल्या प्रदीप खिरडे यांच्या डोक्यात तब्बल आठ देशी दारूच्या बाटल्या फोडत कोयत्याने वार केले असून ते गंभीर जखमी झाले आहेत. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेप्रकरणी आरोपीला जेरबंद करण्यात आले असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भरदिवसा घडलेल्या थरारक घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. पोलिसांचा वचक आरोपींवर राहिला आहे की नाही, असा देखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास प्रदीप हे देशी दारूच्या दुकानात काऊंटर सांभाळत होते. तेव्हा दारूच्या नशेत असलेले तीन आरोपी हे दुकानात आलेल्यांपैकी एकाकडे कोयता होता. त्यातील एकाने आत येताच दगडाने टीव्ही फोडला. दोघांनी काउंटरवरील प्रदीप यांना लक्ष केलं, अगोदर हाताने कॉलर पकडून बाहेर खेचण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रदीप हे त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात एकाने त्यांच्या कानशिलात लगावत दुसरा थेट काउंटरवर चढला आणि कोयत्याचा धाक दाखवत एक-एक अशी करून प्रदीप यांच्या डोक्यात ७ ते ८ देशी दारुच्या बाटल्या फोडल्या. तसेच कोयत्याने वार केले आहेत. घटना सीसीटीव्हीत कैद होऊ नये म्हणून फोडण्यात आला. ही घटना बुधवारी भर दुपारी घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजविल्याचे निदर्शनास आणून देते.
हेही वाचा –
कसारा घाटात घसरली रेल्वे, चालकाच्या प्रसंंगावधानामुळे टळला भीषण अपघात