बॉलिवूडमधील अक्षय कुमार स्टारर फिल्म ‘हाऊसफुल ४’ येत्या काही दिवसांत चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाचा मनोरंजनात्मक ट्रेलर, त्यातील व्यक्तिरेखेचे पोस्टर आणि गाण्यांनी मनोरंजन केल्यानंतर निर्मात्यांनी आता चित्रपटाचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला आहे.
‘हाऊसफुल ४’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आतापर्यंत तीन गाणी रिलीज केली आहेत आणि हे सर्वच गाणी सोशल मीडियावर हीट होताना दिसताय. खासकरुन ‘शैतान का साला’ हे दुसरे गाणे #BalaChallenge सह सोशल मीडियावर चांगलेच धुमाकूळ घालत आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर चाहते #BalaChallenge या चॅलेंजला स्वीकारत त्यांचे व्हिडिओ शेअर करीत आहेत.
या चित्रपटातील गाण्याला अक्षय कुमारने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.
Kaise Bala ki shaitaani machaati hai dhamaal, dekhiye in #Housefull4 iss Diwali https://t.co/M8hGVPvx7Y#SajidNadiadwala @Riteishd @thedeol @kritisanon @hegdepooja @kriti_official@farhad_samji @WardaNadiadwala @foxstarhindi @NGEMovies @ChunkyThePanday
— Akshay Kumar (@akshaykumar) October 19, 2019
‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट साजिद नाडियाडवालाच्या नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट द्वारा निर्मित आणि फॉक्स स्टार स्टुडिओजची सह-निर्मिती आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित हा चित्रपट दिवाळीत २५ ऑक्टोबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.