मेष : प्रेमाला चालना मिळेल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. धंद्यात वाढ होईल.
वृषभ : कामाचा व्याप वाढेल. विरोध मोडून काढतांना संयमाने बोला. धंद्यात आळस नको. हिशोब नीट करा.
मिथुन : भलत्या व्यक्तीच्या मोहाला बळी पडल्यास चांगली संधी हुकेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. ठरविलेले काम होईल.
कर्क : तुमच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होईल. धंद्यातील समस्या सोडवता येईल. घरातील वाद मिटवता येईल.
सिंह : कला क्षेत्रात नविन ओळख होईल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. कोर्टकेस जिंकाल. वाद मिटेल.
कन्या : तुमच्या हेकेखोर स्वभावामुळे समस्या निर्माण होऊ शकते. व्यसनाचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
तूळ : प्रयत्नांना चांगले यश मिळेल. कोर्टकेस जिंकाल. धंद्यात फायदा होईल. नोकरी मिळवा. कलेत प्रगती होईल.
वृश्चिक : तुमचा एखादा शब्द कडवट ठरेल. सावधपणे बोला. खाण्याची चंगळ कमी करा. आरोप येईल. वाहन जपून चालवा.
धनु : ठरविलेली सर्व कामे वेळेत पूर्ण कराल. उत्साह जास्त वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळेल. मौज-मजा कराल.
मकर : स्वतःच्या कार्याला दिशा द्या. धंद्यातील गुंता सोडवा. मैत्रीतून चांगला फायदा करून घेता येईल. ओळख वाढेल.
कुंभ : विचारांना चालन मिळेल. प्रेमात यश मिळेल. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रीडा क्षेत्रात प्रगतीची नवी संधी मिळेल.
मीन : महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरासंबंधी प्रश्न सुटेल. कुटुंबाच्या हितासाठी योजना बनवाल. प्रतिष्ठा वाढेल.