बॉक्स ऑफिसवर ‘मर्दानी’ राणी मुखर्जीचीच चर्चा आहे. ‘पानिपत’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटांशी स्पर्धा असूनही ‘मर्दानी २’ तिकीटबारीवर चांगली कामगिरी करत आहे. पाच दिवसांत या चित्रपटाने २३.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. ‘मर्दानी’ २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता.
अभिनेत्री राणी मुखर्जी अभिनीत आणि आदित्य चोप्रा निर्मीत ‘मर्दानी २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. चित्रपटात राणी मुखर्जी पोलिसाच्या भूमिकेत असून राणीचा अभिनय पोलिसाच्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडणारा आहे. यापूर्वी २०१४ मध्ये ‘मर्दानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यावेळीसुद्धा चित्रपटाची कथा आणि राणी मुखर्जीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
मर्दानी २’ची कमाई-
शुक्रवार- ३.८० कोटी रुपये
शनिवार- ६.५५ कोटी रुपये
रविवार- ७.८० कोटी रुपये
सोमवार- २.८५ कोटी रुपये
मंगळवार- २.६५ कोटी रुपये
#Mardaani2 maintains a strong grip on Day 5… Tue biz is at par with Mon biz… Crosses *Week 1* biz of #Mardaani [₹ 22.97 cr] in *5 days*… Fri 3.80 cr, Sat 6.55 cr, Sun 7.80 cr, Mon 2.85 cr, Tue 2.65 cr. Total: ₹ 23.65 cr. #India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) December 18, 2019
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाची कमाई चांगली झाली आहे. चित्रपटात राणी मुखर्जी वगळता बाकी सगळेच चेहरे नवीन आहेत. दित्य चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गोपी पुराथन यांनी पार पाडली आहे.