- Advertisement -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगलेली होती. आज मनसेचे पहिले अधिवेशन होत आहे, या अधिवेशनाच्या ठिकाणी स्टेजवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून सावरकरांवर होणारी टीका आणि त्यानंतर शिवसेनेची सावरकरांबद्दल मवाळ झालेली भूमिका पाहता मनसेची ही कृती त्यांच्या पुढीच वाटचालीची चुणूक दाखवत आहे.
- Advertisement -