घरताज्या घडामोडीअमित ठाकरेची राजकारणात एंट्री? आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

अमित ठाकरेची राजकारणात एंट्री? आई शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया

Subscribe

मनसेची स्थापना झाल्यापासून आज पहिल्यांदा पक्षाचे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून मनसे नवी विचारधारा अवलंबणार आहे, असे बोलले जात आहे. तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. अमित ठाकरे यांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले तरी त्यांच्या आई शर्मिला ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, “अमितला सक्रिय राजकारणात उतरायचे असल्यास त्याने निर्णय घ्यावा. तो राजकारणात आल्यास मला आनंदज होईल. मागच्या दोन वर्षांपासून तो मनसेच्या विविध कार्यक्रम आणि आंदोलनात सहभागी होत आला आहे. मात्र हा निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरेच जाहीर करु शकतील, आता त्याबद्दल अधिक काही बोलता येणार नाही.”

- Advertisement -

आम्ही घरी राजकारणाची चर्चा करत नाही

आज मनसेच्या नव्या झेंड्याचे अनावरण होणार आहे, याबाबत शर्मिला ठाकरे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, आम्ही घरी राजकारणाची चर्चा करत नाही. महाराष्ट्रातील जनतेप्रमाणेच आम्हालाही झेंडा पाहण्याची उत्सुकता लागलेली आहे. तसेच सावरकर यांचा फोटो स्टेजवर आहे, याबाबत पक्षाची भूमिकाही सध्या माहीत नसल्याचे त्या म्हणाल्या. एकूणच संध्याकाळी राज ठाकरेंच्या भाषणानंतर सर्व गोष्टी जाहीर होतील. त्यामुळे माध्यमांनी वाट पाहावी, असाही सल्ला त्यांनी दिला.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी देखील अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत वक्तव्य केले आहे. अमित ठाकरे यांनी सक्रिय राजकारणात यावे, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र याबाबत राज ठाकरेच निर्णय घेऊ शकतील असेही त्यांनी सांगितले.

हे वाचा – Live: मनसे महाअधिवेशन, स्टेजवर प्रबोधनकारांसहीत सावरकरांचाही फोटो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -