घरव्हिडिओनांदेडमधील धबधबा पहिल्याच पावसात बहरला

नांदेडमधील धबधबा पहिल्याच पावसात बहरला

Related Story

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड येथील पैनगंगा नदीवरचा धबधबा पहिल्याच पावसाने प्रवाहित झाला आहे. रात्री हदगाव, उमरखेड या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा नदी प्रवाहित झाली. सहस्त्रकुंड येथील धबधब्याला सुरु होताच त्याचे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येतात. मात्र, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे याठिकाणी फारशी गर्दी झालेली नाही. तरीही आजूबाजूचे तेलंगणा विदर्भ आणि मराठवाड्यातील नागरिक धबधबा पाहण्यासाठी आलेले दिसत आहेत. जूनच्या पहिल्याच पंधरवाड्यात सहस्त्रकुंडचा धबधबा प्रवाहित झाल्याने यंदा पावसाचे प्रमाण चांगले राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. या धबधब्याचा उल्लेख विविध ग्रंथांमध्ये आहे. माता रेणुका परशुराम आणि अनेक देवी-देवतांचा वास या ठिकाणी झालेला आहे, असे काही ग्रंथांमध्ये आढळते.

- Advertisement -