मुंबईः मनसेच्या गोरेगावातील शाखेचे राज ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेय. विजय बोरा यांच्या शाखा क्रमांक 40 च्या उद्घाटनासाठी आले असता तिकडचा स्टेज कोसळल्यानं एकच खळबळ उडालीय. गोरेगावातील कार्यक्रमादरम्यान राज ठाकरे उभे असलेला स्टेज अचानक कोसळलाय. राज ठाकरे उभे असलेल्या स्टेजचा समोरचा भाग कोसळलाय. 365 दिवस महाराष्ट्रात शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आपल्या राजाचा तो दिवस असल्याचंही ते म्हणालेत.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन सुरू आहे. मुंबईत चांदिवली आणि गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांदिवली येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे हे गोरेगाव पूर्व येथे दाखल झाले होते. यावेळी स्थानिक मनसे कार्यकर्ते आणि नागरिकांची गर्दी मोठी होती. गोरेगाव येथे मनसे शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याच दरम्यान राज ठाकरे उभे असलेला स्टेज कोसळला, त्यानंतर राज ठाकरेंनी उपस्थितांना काळजी घेण्याचंही आवाहन केले.
विशेष म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते साकीनाका येथील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. त्यावेळीही शाखेत आल्यानंतर मला न्याय मिळाला पाहिजे, असा लोकांना विश्वास वाटला पाहिजे. ही शाखा आहे दुकान नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे इशारा दिलाय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही कंबर कसली असून, कार्यकर्त्यांनी शाखा बांधणीपासून ते विविध कार्यक्रम हाती घेतलेत. त्याचाच एक भाग म्हणून आज साकीनाक्यात मनसेने शाखेची स्थापना केली होती. साकीनाक्यात मनसेचं वर्चस्व होतं. मात्र, काही नगरसेवक शिवसेनेत गेल्याने मनसेला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे साकीनाक्यात पुन्हा एकदा मनसेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचं दिसत आहे.
हेही वाचाः दिशा सालियनची बलात्कार करून हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप