घरमहाराष्ट्रदिशा सालियनची बलात्कार करून हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

दिशा सालियनची बलात्कार करून हत्या, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप

Subscribe

दिशा सालियनवर बलात्कार होताना बाहेर प्रोटेक्शन कोणाचं होतं. सालियनचा पोस्ट मॉर्टेमचा रिपोर्ट अद्याप का आला नाही?, सात महिन्यात यायला पाहिजे. सात महिने होऊन गेले अजून का आला नाही. दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या दिवसाची तिच्या बिल्डिंगच्या रजिस्टरमध्ये पानं का नाहीत, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केलाय.

मुंबईः दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलाय. 8 जूनला दिशा सालियानची बलात्कार करून हत्या झाली. सांगितलं आत्महत्या केली म्हणून. का करेल ती आत्महत्या, एक तर ती त्या पार्टीला जात नव्हती. जबरदस्ती बोलावलं. तिचा तो मित्र रोहन राय, त्यानंतर तिला थांबायला सांगितलं, पण ती थांबली नाही. ती निघाली, त्यानंतर कोण कोण होते. पोलीस प्रोटेक्शन कोणाला होते, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केलाय. नारायण राणेंनी आज मुंबईतील त्यांच्या जुहू बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली त्यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केलेत.

दिशा सालियनवर बलात्कार होताना बाहेर प्रोटेक्शन कोणाचं होतं. सालियनचा पोस्ट मॉर्टेमचा रिपोर्ट अद्याप का आला नाही?, सात महिन्यात यायला पाहिजे. सात महिने होऊन गेले अजून का आला नाही. दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या दिवसाची तिच्या बिल्डिंगच्या रजिस्टरमध्ये पानं का नाहीत. कोणी फाडली. कोणाला इंटरेस्ट होता. त्यानंतर सुशांत सिंग याला जेव्हा कळलं. तेव्हा तो कुठे तरी बोलला मै इनको छोडूंगा नाही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले आणि घरात जाऊन बाचाबाची झाली. आणि त्यात बिचाऱ्याची हत्या करण्यात आली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती. त्या बिल्डिंगमध्ये कॅमेरे लागले होते ते गायब कसे झाले. सीसीटीव्ही गायब कसे झाले, असंही नारायण राणे म्हणालेत.

- Advertisement -

13 जूनला रात्री सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पहिले होते, लोक सांगतात. ठरावीक माणसाची अॅब्युलन्स कशी आली. अॅब्युलन्स कोणी आणली. हॉस्पिटलला कोणी नेलं. सगळे पुरावे नष्ट कोणी केले. याची चौकशी होणार आहे. यात कोणते अधिकारी होते तेही आता माहितीय. ते आता राहिले नाहीत. तेही आता उघडं करतील सगळं. हा महाराष्ट्र बलात्कार करायचे, ठार मारायचे. मुंबईत अनेक कलाकार येतात, पण अशा तरुण कलाकाराची हत्या झाली, असं म्हणत नारायण राणेंनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -