मुंबई – आज प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे निरंजन डावखरे यांनी शासनाकडे नोंदणी केलेल्या बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासंबंधी माझा प्रश्न आहे. जनगणनेचे काम अनेकदा शिक्षकांवर अतिरिक्त बोजा म्हणून लादले जाते. त्याऐवजी या कामासाठी या बेरोजगारांना शासन समाविष्ट करून घेणार का? ? या संदर्भात एखाद्या पॉलिसीचा शासन विचार करणार आहे का?, असा प्रस्श विचारला होता. याला उत्तर देताना कैशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मिस्कील टिपण्णी केली. या टिपण्णी केल्यानंतर आमदारांच्यात हशा पिकला
काय म्हणाले मंत्री मंगलप्रभात लोढा –
विविध प्रश्नांची उत्तरे देताना मंगलप्रभात लोढा मिस्किलपणे म्हणाले, “सभापती महोदया, एक तर मी नवीन प्लेयर आहे, त्यात मला ओपनिंगला उभं केलं आहे आणि माझ्यावर बाऊन्सर वर बाऊन्सर टाकले जात आहेत. आता तरी थांबा कारण त्या प्रश्नाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
त्या खासगी अस्थापनांना पोर्टलवर नोंदणी बंधनकारक –
पुढेत्यांनी तुमच्या सर्व प्रश्नांवर मी सविस्तर उत्तर देईन. दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असलेल्या खाजगी आस्थापनांनी कौशल्य विभागाच्या पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे” असे उत्तरही त्यांनी दिले. ते प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारींच्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.