घरदेश-विदेश'भारतरत्न' देऊन गौरव केला पाहिजे, सिसोदियांचे मुख्यमंत्री केजरीवालांकडून कौतुक

‘भारतरत्न’ देऊन गौरव केला पाहिजे, सिसोदियांचे मुख्यमंत्री केजरीवालांकडून कौतुक

Subscribe

नवी दिल्ली : राज्य उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य 15 जणांविरुद्ध सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. यावरून भाजपा विरुद्ध आम आदमी पार्टी यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सिसोदिया यांच्या कामाची प्रशंसा करताना, ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सत्कार करण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची टीका त्यांनी केली.

- Advertisement -

दिल्लीसह गुरुग्राम, चंदिगढ, मुंबई, हैदराबाद, लखनऊ, बंगळुरू यासह 31 ठिकाणी सीबीआयने छापे टाकल्यानंतर केजरीवाल यांचे निकटवर्तीय समजले जाणारे मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांवर एफआयआर दाखल केला. त्यात पहिल्या क्रमांकावर मनीष सिसोदिया आहेत. तर, उर्वरित आरोपींमध्ये मद्यनिर्मिती कंपनीचे अधिकारी, डिलर, काही सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आता यावरून भाजपा आणि आम आदमी पार्टीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आपसोडून भाजपात या तुमच्याविरुद्धचे सीबीआय आणि ईडीची सर्व प्रकरणे बंद करतो, अशी ऑफर भाजपाने दिली होती आणि ती मी धुडाकवली, असा दावा सिसोदिया यांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच मनीष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद घेऊन सीबीआयचे आरोप फेटाळले होते. मला दोन-चार दिवसांत अटक केली जाईल, असे ते म्हणाले होते. तर, आम आदमी पार्टीचा भ्रष्टाचार आणि बइमानी भाजपा पूर्णपणे उघड करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याकडे जनतेच्या एकाही प्रश्नाचे उत्तर नाही, असा पलटवार भाजपाने केला आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे स्वत्: सिसोदिया यांच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. ते सध्या गुजरातदौऱ्यावर आहेत. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनीष सिसोदिया यांच्या कामाची प्रशंसा केली. सिसोदिया यांनी सरकारी शाळांमध्ये ज्या काही सुधारणा केल्या आहेत, तशा सुधारणा अन्य कोणत्याही पक्षाने गेल्या 70 वर्षांत केल्या नव्हत्या. अशा व्यक्तीचा ‘भारतरत्न’ देऊन गौरव करायला हवा. तसेच त्यांच्या सर्व देशातील शिक्षणव्यवस्था त्यांच्या हाती सोपविली पाहिजे, पण त्याऐवजी त्यांच्यावर सीबीआयचे छापे टाकले जात आहेत, अशी टीका केजरावाल यांनी केली आहे.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -