घरमहाराष्ट्रनाशिकनाशकात डिझेलपेक्षा सीएनजी झाला महाग

नाशकात डिझेलपेक्षा सीएनजी झाला महाग

Subscribe

नाशिक : पेट्रोलला पर्याय म्हणून अनेकांनी सीएनजी वाहनांचा पर्याय निवडला. मात्र, आता सीएनजी वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती. परंतु, सोमवारी नाशकात सीएनजीच्या दरात चार रूपयांची वाढ करण्यात झाली आहे. या दरवाढीने आता डिझेललाही मागे टाकले आहे.

पेट्रोल, डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ यामुळे वाहनधारकांनी सीएनजीचा पर्याय निवडला. अनेकांनी तर पेट्रोलला स्वस्त पर्याय म्हणून चाळीस ते पन्नास हजार रूपये खर्च करून आरटीओ प्रमाणित सीएनजी कीटही बसवले आहेत. परंतु, सीएनजीचा तुटवडा जाणवू लागल्याने अगदी भल्या पहाटे वाहनांच्या रांगा दिसू लागल्या. यानंतर सीएनजीच्या वाढत्या दरामुळे वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त होत होती. त्यानंतर तीन रूपयांनी सीएनजीचे दर कमी करण्यात आले होते. त्यावेळी ९२ रूपयाने सीएनजी मिळत होता. मात्र, रविवारी मध्यरात्रीपासून तीन रूपयांनी दर वाढले असून आता सीएनजीचे दर ९६.१५ रूपये प्रतीकिलोपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी मेअखेरीस सीएनजीचे दर १० रूपयांनी वाढले होते. नाशकात सोमवारी डिझेलचा दर ९३.१५ रूपये प्रती लिटर इतका होता.

- Advertisement -
बदलत्या तंत्रज्ञानामुळे कोंडी

पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे अनेकांनी डिझेलची वाहने खरेदी केली. मात्र, डिझेल आणि पेट्रोलचे दर जवळपास सारखे झाल्याने ग्राहकांचा कल सीएनजी वाहनांकडे गेला. काहींनी तर आपल्या पेट्रोलवरील वाहनांना सीएनजी किट्स बसवून घेतले. आता, हा गॅसही महागला. त्यातच दमदार अशा इलेक्ट्रीक वाहनांचाही पर्याय समोर आल्याने अनेकांची कोंडी झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -