तुम्हाला सलमान खानचा लकी चित्रपट आठवतोय का? या सिनेमात अगदी ऐश्वर्या राय सारखी दिसणारी मुलगी आठवतेय का? या अभिनेत्रीचं नाव स्नेहा उल्लाल. आपल्या लूक्सवरून बॉलिवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री आता १४ वर्षांनी पून्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. या अभिनेत्रीने सलमान खान सोबत लकी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल दाखवू शकला नाही. मात्र स्नेहाच्या लूक्समुळे ती अधिक चर्चेत आली होती. स्नेहा ज्यावेळेस बॉलिवूडमध्ये आली त्यावेळेस सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नुकतेच ब्रेकअप झाले होते. आता ही अभिनेत्री पून्हा पडद्यावर दिसणार आहे. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली आहे.
काय म्हणाली स्नेहा
“मी खूप खूश आहे की मी पुन्हा पडद्यावर काम करणार आहे. मी या वेळेचा मागील अनेक वर्षांपासून वाट बघत होती. चित्रपटाचा हा काळ महिलांसाठी आहे. जेव्हा मी चित्रपटात काम करण्यास सुरूवात केली होती तेव्हा पासून आता परिस्थिती खूप बदलली आहे. यावेळी डिजीटल प्लॅटफॉर्मही चांगले प्रदर्षन करत आहे.नेटफिक्स बरोबर काम करून मला आनंद होत आहे.” – स्नेहा उल्लाल, अभिनेत्री