घरताज्या घडामोडीMaharashtra Weather : अवकाळी पावसाचा फटका; आंबा, भात शेतीचं नुकसान तर टोमॅटोही...

Maharashtra Weather : अवकाळी पावसाचा फटका; आंबा, भात शेतीचं नुकसान तर टोमॅटोही सडले

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावासमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गारपीट आणि वादळामुळे टोमॅटो सडल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावासमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, गारपीट आणि वादळामुळे टोमॅटो सडल्याची माहिती समोर येत आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. (maharashtra weather tomato rice crop loss due to unseasonal rain in bhandara wardha solapur yavatmal hingoli)

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळं उन्हाळी भात पीक, आंबा, भाजीपाला, टरबूज, भाजीपाला आणि फळपीकांचे मोठं नुकसान झाले आहे. शिवाय, 18 घरांचं अंशतः नुकसान झालं असून वीज पडून 6 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

- Advertisement -

1 एप्रिल ते 23 एप्रिल या कालावधीत भंडारा जिल्ह्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. यामध्ये 257 हेक्टर क्षेत्रातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले असून याचा फटका 424 शेतकऱ्यांना बसला आहे. याशिवाय, यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी काही भागात गाराही पडल्या होत्या.

अवकाळी मूसळधार पावसामुळे शेतातील तीळ, उन्हाळी ज्वारी, आंबा, पालेभाज्या या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तीळ या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे सरकारने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहेत. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील निंबी पार्डी परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे झाडे पडली असून घरावरील पत्रेही उडाल्याचे समजते.

- Advertisement -

वाशिम जिल्ह्यात विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या महिन्याभरापासून चौथ्यांदा अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकऱ्यामध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे पारडी, एकांबा, आजनादेवी, नारा या भागात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

गारपिटीमुळे बागायत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा, आंबे अशा झाडाची पडझड झाली असून काहीच्या शेतातील टोमॅटो, भेंडी, वांगे, कांदे या पिकावर गारा पडल्या. त्यामुळे टोमॅटो फुटले आणि गळून पडले आहे.


हेही वाचा – Maharashtra Weather : अवकाळी पावसाचा तडाखा; शेतीपिकांचं मोठं नुकसान, चिमुकलीनेही गमावला जीव

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -