घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : पूल नाही तर मतदान नाही; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील...

Lok Sabha Election 2024 : पूल नाही तर मतदान नाही; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील गावकरी आक्रमक

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. सर्वत्र प्रचार करत असून मतदानासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करत आहेत. परंतू, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील लोकांनी मतदान न करण्याचा निर्धार केला आहे.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षांनी तयारीला सुरूवात केली आहे. सर्वत्र प्रचार करत असून मतदानासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन करत आहेत. परंतू, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर गावातील लोकांनी मतदान न करण्याचा निर्धार केला आहे. त्याच कारण अर्धवट राहिलेला पूल. (lok sabha election 2024 no pool no voting bridge khidrapur maharashtra karnataka border)

महाराष्ट्रात कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारने 28 कोटी रुपये खर्चून कृष्णा नदीवर खिद्रापूर गावाच्या सीमेपर्यंत पूल बांधले आहे. मात्र, पुलाची महाराष्ट्राच्या बाजूचा रॅम्प बांधण्यासाठी महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांची शेती अधिग्रहीत करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने पूर्ण केलेली नाही. त्यामुळे पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांची शेती अधिग्रहीत करण्याकरीता 80 लाख रुपये खर्च करून पुलाच्या उर्वरित बांधकामासाठी (महाराष्ट्राच्या बाजूने उतरंड बनविण्यासाठी) जागा द्यायची आहे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राच्या बाजूने दिरंगाई होत असल्याने पुलाचा बांधकाम रखडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.

- Advertisement -

परिणामी खिद्रापूर आणि त्याच्या अवतीभवतीच्या महाराष्ट्रातील गावांमधील नागरिक कर्नाटकात ये-जा करू शकत नाही. त्यामुळे कर्नाटक सरकार 28 कोटी रुपये खर्च करून पूल महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पूल बांधू शकते. मात्र, त्या पुलाच्या उतरंडसाठी महाराष्ट्र सरकार 80 लाख रुपये खर्च करून आवश्यक जागा देऊ शकत नसेल, तर आम्ही मतदान का करावं असा प्रश्न खिद्रापूर मधील तरुणांनी उपस्थित केला आहे.

याशिवाय, सरकारला आमच्या दळणवळणाची, पुराच्या काळातील सुरक्षिततेची काळजी नसेल, तर आम्हीही मतदान करणार नाही असा निर्धार गावातील अनेक मतदारांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे कृष्णा नदीत पूर आल्यास उंच भागाकडे सुरक्षित जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. असे असतानाही महाराष्ट्र सरकारकडून पुलाच्या बांधकामात दिरंगाई करत असल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – LOK SABHA 2024 : काँग्रेसची चिंता मिटली, नसीम खान करणार वर्षा गायकवाडांचा प्रचार

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -