काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. मात्र राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. आज या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळाला असून सुजय विखे पाटील यांनी गिरीश महाजन यांची मुंबई येथे भेट घेतल्याचे वृत्त समजते आहे. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली असून पुढील निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे कळते.
सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा मध्ये सुरु झाली होती. मात्र सुजय राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्यास इच्छूक नाहीत. तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात खासगीत बैठक झाल्या. मात्र पवारांनी अशा बैठका झाल्याच नसल्याचे जाहीर सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काय भूमिका घेईल? याचा थांगपत्ता विखेंना लागत नाही. म्हणूनच सुजय यांना भाजपचा पर्याच उरताना दिसत आहे.