अभिनेत्री प्रियांका चोप्रा आपल्या पती निक जोनससोबत शुक्रवारी ७२ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहचली होती. या फेस्टिव्हलमध्ये दोघेही एकत्र दिसले. प्रियांकाने यंदा केलेले कान्स मधील पदार्पण शानदार होते. सोशल मीडियावर प्रियांकाचा कान्समधील लूक व्हायरल झाला. परंतु आता निक जोनसच्या फोटोंसोबत प्रियांकाने घातलेल्या घड्याळ वरून चांगलीच चर्चा होतांना दिसते.
तिने घातलेल्या ड्रेसमुळे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी तिने विंटेज वेव्ज, सिल्वर चॉपर्ड ईयरिंग्स आणि हातात अंगूठी घालून आपला लूक पुर्ण केला. प्रियांका तिच्या स्टाईलमुळे नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. ती परिधान करत असलेले कपडे, बॅग्स महाग आणि ब्रॅण्डेड असल्याने ती साऱ्यांना आकर्षित करून घेते. प्रियांका अशी अभिनेत्री आहे की, बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंत तिने आपली ओळख बनवली आहे.
कान्स शिवाय प्रियांकाच्या एका फोटोने आपल्या चाहत्याचे लक्ष तिने घातलेल्या घड्याळ्याने वेधून घेतले. या फोटोमध्ये प्रियांका निक सोबत दिसत असून तिने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि सॅटिनचे ब्लेझर परिधान केले आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या ड्रेसिंगसह तिने रोज गोल्ड रंगाचे घड्याळ घातले आहे. हे घड्याळ खूपच महागडे आहे. ते Chopard या ब्रॅण्डचे असून त्याला हिरे लावण्यात आले आहे. या घड्याळ्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ‘ये कान्स जाने का समय है, इस Chopard के साथ.’ असे कॅप्शन दिले आहे.
टाइम्सनाऊच्या माहितीनुसार, प्रियांका चोप्राच्या या Happy Sport ३६ mm Automatic Watch ची किंमत ३८,२०० CHF आहे. भारतीय किंमतीनुसार त्याची किंमत २६ लाख ५४ हजार रुपयाच्या जवळपास आहे.