घरताज्या घडामोडीमहाडमधील एटीएम पुरानंतर बंदच!

महाडमधील एटीएम पुरानंतर बंदच!

Subscribe

बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा येथे आहेत.

महाड शहरात पूर येऊन गेला याला आता एक महिना उलटला आहे. अर्ध्याहून अधिक बाजारपेठ सुरु झाली तरी राष्ट्रीयकृत बँकांचे कामकाज अद्याप पूर्णपणे सुरू झालेले दिसत नाही. सर्वच राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम अद्याप बंद असल्याने मोबाईल एटीएमसाठी नागरिकांना भर पावसात उभे राहावे लागत आहे. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि बँक ऑफ बडोदा या राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा येथे आहेत. या बँकांचे शहरासह तालुक्यातील हजारो ग्राहक आहेत. यामध्ये अधिकाधिक ग्रामीण भागातील वयोवृद्ध नागरिक, पेन्शनर, सरकारी कर्मचारी, महिला बचत गट आदींची खाती आहेत. पुरामुळे या बँकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बँकांचे एटीएम रस्त्यालगत असल्याने पुराच्या पाण्यात बुडाले. नादुरुस्त झालेले एटीएम साफसफाई नंतर काढून टाकण्यात आले आहेत. पुरानंतर खरी गरज निर्माण झाली ती पैशाची. याकरिता अनेकांनी गोरेगाव, माणगाव या ठिकाणी धाव घेत एटीएममधून पैसे काढले. सुरुवातीचे १५ दिवस अशाच मार्गाने आर्थिक गरज पूरग्रस्त भागवत होते.

स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीसीआय या बँकांकडून मोबाईल एटीएम सुविधा सुरू करण्यात आली. याचा फायदा चांगलाच झाला आहे. एक महिन्यानंतर बँकांनी आपले एटीएम सुविधा सुरळीत करणे आवश्यक असताना ही सेवा ठप्पच असल्याने नाराजीची भावना आहे. एटीएम बंद असल्याने शहरातील नागरिकांप्रमाणे गणेशोत्सवाला गावी येणार्‍यांचीही मोठी गैरसोय होणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ‘अँटिलिया’च्या बाहेर स्फोटकांची SUV सापडल्याने नीता अंबानींनी रद्द केला होता गुजरात दौरा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -