Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव

दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेचा लिलाव

Related Story

- Advertisement -

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा आज लिलाव झाला. दाऊदच्या सातपैकी सहा मालमत्ता विकल्या गेल्या आहेत. एक मालमत्ता लिलावातून हटवण्यात आली आहे. दोन वकिलांनी या मालमत्ता खरेदी केल्या आहेत. यातील चार मालमत्ता (जमिनी) भूपेंद्र भारद्वाज यांनी, तर दोन मालमत्ता अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली. दाऊदचा बंगला वकील अजय श्रीवास्तव यांनी खरेदी केली. हा बंगला ११ लाख २० हजार रुपयांना विकला गेला. मुंबईत ही लिलाव प्रक्रिया पार पडली असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये दाऊदची लिलाव झालेली मालमत्ता होती. १३ पैकी ७ मालमत्तांचा आज लिलाव पार पडला. याआधी दाऊदची मुंबईतील जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री केल्यानंतर मंगळवारी त्याच्या मूळ गावातील म्हणजेच रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव करण्यात आला.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या मालमत्तेचा पार पडला आहे. कोविडच्या संकटामुळे हा लिलाव प्रत्यक्ष जागेवर येऊन न करता मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडला. लिलावाआधी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणार्‍या मालमत्तेची पाहणी केली होती. जे बोलीधारक या लिलावात भाग घेणार होते, ते देखील या अधिकार्‍यांसोबत उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. एकूण सहा मालमत्तांचा लिलाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर याचे मूळ गाव हे खेड तालुक्यातील मुंबके आहे. या गावात त्याचा बंगला होता, तर आंब्याची बाग असून लोटे आणि खेड शहर अशा सहा ठिकाणी त्याच्या वेगवेगळ्या मालमत्ता होत्या.

- Advertisement -

केंद्र सरकारने या मालमत्ता ताब्यात घेऊन त्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आज या मालमत्तांचा लिलाव पार पडला आहे. साफेमानुसार, (स्मगलर्स फॉरेन एक्स्चेंज मॅनिपुलेटर अ‍ॅक्ट) एकूण १७ मालमत्तांचा लिलाव करण्यात आला आहे. दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण मालमत्ता घेण्यासाठी इच्छुक असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर हा गुन्हेगारी विश्वाचा किंग म्हणून ओळखला जातो. भारतासाठी दाऊद मोस्ट वॉण्टेड आहे. ६४ वर्षीय डॉन दाऊद इब्राहिम हा मुंबईवरील १९९३ मधील साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. दाऊदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषीत केले आहे.

- Advertisement -