घरताज्या घडामोडीतुम्हाला मुलं-बाळंआहेत, मी मागे लागलो तर..

तुम्हाला मुलं-बाळंआहेत, मी मागे लागलो तर..

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना इशारा

तुम्हाला मुलं-बाळं आहेत, कुटुंब आहे, जर मी मागे लागलो तर… असा गंभीर इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत ‘दै. सामना’मध्ये शुक्रवारपासून प्रसिद्ध होणार आहे. त्यापूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले. या मुलाखतीत राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड प्रश्न विचारत असताना उद्धव ठाकरेही जशास तसे उत्तर देताना पाहायला मिळत आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी विरोधकांना गंभीर इशारा दिल्याचे दिसून येते.

संजय राऊतांनी पोस्ट केलेल्या दुसर्‍या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, मराठी महाराष्ट्रामध्ये गाडून त्याच्यावर तुम्ही नाचणार…आम्ही ते उघड्या डोळ्याने सहन करू? ज्यांना ज्यांना मुलं-बाळंआहेत, त्यांनी आरशात बघावं, तुम्हालाही मुलं-बाळं आहेत, तुम्हालाही कुटुंब आहेत, तुम्हीही धुतल्या तांदळासारखे नाही, जर मी मागे लागलो तर मग…असा गंभीर इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे.

- Advertisement -

या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे देखील काही प्रश्नांवर बिचकल्याचे दिसत आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. ४४ सेकंदांचा हा प्रोमो आहे.

मुलाखतीच्या प्रोमोमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फक्त हात धुवा सांगण्यापलिकडे काय करतात? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. यावर उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना इशारावजा उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘ठीक आहे, हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे जाईन’ हे असे विकृत बुद्धीचे चाळे तुम्ही करू नका. कारण विकृती ही विकृती असते. जेव्हा आव्हान मिळते तेव्हा मला जास्त स्फूर्ती येते. कोणी कितीही आडवे आले तर त्या आडवे येणार्‍यांना आडवे करून महाराष्ट्र पुढे जाईल, असा इशारा दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -