घरलाईफस्टाईलस्वादिष्ट रवा ऑम्लेट

स्वादिष्ट रवा ऑम्लेट

Subscribe

बऱ्याचदा सकाळी ऑफिसला जाताना किंवा सायंकाळी कामावरुन घरी आल्यानंतर नाश्ता काय करावा असा प्रश्न पडतो. अशावेळी तुम्हाला चमचमीत खायचे असल्यास ‘स्वादिष्ट रवा ऑम्लेट’ नक्की ट्राय करा.

साहित्य

- Advertisement -
  • १ कप दही
  • १ कप रवा
  • मोहरी
  • कडीपत्ता
  • हळद
  • मिरची
  • चवीनुसार मीठ
  • तेल

कृती

सर्वप्रथम रवा आणि दही एकत्र करुन घ्यावे. हे मिश्रण घट्ट असल्यास त्यात थोडे पाणी घालून पुन्हा एकदा चांगले एकजीव करुन घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात तेल घालून त्यात एक चमचा मोहरी, मिरची,कडीपत्ता आणि हळद घालून ही तयार फोडणी त्या मिश्रणात घालून घ्यावी. त्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यावे. नंतर एका पॅनमध्ये थोडे तेल घालून त्यात ते मिश्रण टाकून घ्यावे. नंतर हे मिश्रण परतून घ्यावे, अशाप्रकारे झटपट नाश्ता तयार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -