घरCORONA UPDATECM Uddhav Thackeray Live: लॉकडाऊन हळुहळु मागे घेणार - मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray Live: लॉकडाऊन हळुहळु मागे घेणार – मुख्यमंत्री

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत.

महाराष्ट्रात मे महिन्याच्या अखेरीस दीड लाख केसेस असतील असा अंदाज ICMR ने अंदाज व्यक्त केला होता.

- Advertisement -

मात्र आज ३३,७८६ केसेस आहेत. एकूण रुग्ण ४७ हजार असले तरी यामध्ये व्हायरसने शिरकाव केल्यापासूनचे एकूण रुग्ण आहेत. त्यामुळे एकूण अॅक्टिव्ह केसेस ३३,७८६ हजार आहेत. १३,४०४ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत.

केंद्राच्या अंदाजाला आपण खोटे ठरवू शकलो कारण लोकांनीच शिस्त पाळली.

- Advertisement -

मुंबईमध्ये कोविड पॉझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांची बालके कोविड निगेटिव्ह जन्माला आली आहेत. हा निसर्गाचा चमत्कार आहे.

मुंबईमध्ये ९० वर्षांच्या आजींनी देखील कोरोनाला हरवले आहे. नवजात बालकांपासून ते ९० वर्षांच्या वृद्धांपर्यत सर्वच कोरोनाला हरवत आहेत.

पुढील काही काळात आणखी केसेस वाढण्याची शक्यता आहे. पण घाबरण्याची गरज नाही.

राज्यात काही लाखांच्या घरात आपण रुग्णांना उपचार देऊ शकू, अशी व्यवस्था निर्माण करत आहोत.

इतर राज्यांपेक्षा आपण काय करत आहोत. त्यावर लक्ष देऊया.

रुग्णांची आबाळ होत आहे, अशा बातम्या येत आहेत. त्यात सत्यता आहे. कारण हे संकटच एवढे मोठे आहे, त्यामध्ये काही जणांची गैरसोय झाली असेल.

आता ७००० हजार बेड्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. पुढच्या महिन्यात आपण आणखी १५ हजार बेड्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करुन देणार आहोत.

मुंबईत व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची रुग्णांना जास्त गरज असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे यापुढे फिल्ड हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजनचा पुरवठा करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत.

मागे मी रक्तपुरवठा अपुरा असल्याचे सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी पुढे येऊन रक्तदान केले होते. आता राज्यात पुढचे १० पुरेल इतका रक्तसाठा आहे, त्यामुळे आता रक्तदात्यांनी पुन्हा एकदा पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करतो.

आता काही दिवसांत पावसाळा येत आहे. पावसाळ्यात काही साथाचे आजार डोके वर काढतात.

यावेळी पावसात भिजणे, मजा करणे अशा गोष्टी तुर्तास टाळाव्या लागतील. पाणी गरम करुन पिणे आणि इतर आजारांपासून लांब राहणे म्हणजेच कोरोनापासून लांब राहणे, असे आहे.

ज्याप्रमाणे आपण उन्हाळी साथीपासून लांब राहिलो, त्याप्रमाणे पावसाळी साथींपासून आपण लांब राहिले पाहीजे.

सर्दी, खोकल्यापेक्षा कोरोनाची काही नवीन लक्षणे पुढे येत आहेत. त्यामध्ये वास न येणे, थकवा जाणवतोय, तोंडाची चव गेलेली असणे… ही आता कोरोनाची प्राथमिक लक्षणे असल्याचे समोर आले आहे.

दुर्दैवाने महाराष्ट्रात १५०० मृत्यू झालेले आहेत. यातील अनेक रुग्ण शेवटच्या टप्प्यात आपल्याकडे आलेले आहेत.

जे रुग्ण बरे झाले आहेत. ते रुग्ण वेळेवर आल्यामुळे त्यांच्याव योग्य उपचार झालेले आहेत.

कोरोनावर जरी औषध नसले तरी कोविड युद्धातले डॉक्टर आपल्या प्रयत्नांची शर्थ करुन योग्य औषध देत आहेत.

ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळत आहेत, त्यांनी वेळेत डॉक्टरकडे आले पाहीजे.

काही लाखांच्या घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये संभाव्य रुग्णांना आपण उपचार दिलेले आहेत.

ग्रामीण भागातील लोक खूप जि्ददीने या लढ्यात उतरले आहेत.

ग्रामीण भागातील लोकांनी कोविडचे संक्रमण मर्यादित ठेवले आहे.

काहीजण म्हणतायत की पॅकेज दिले नाही. पण आजपर्यंत खूप पॅकेज आले, पण लोकांना काय मिळाले. हे पाहावे लागेल.

महात्मा जोतीराव फुले योजनेद्वारे नोंदणीकृत हॉस्पिटलमधून सर्व रुग्णांना मोफत उपचार दिले जाणार आहेत.

साडे पाच ते सहा लाख परप्रांतिय मजुरांची आपण जेवणाची सोय केली. पण त्याचे पॅकेज आम्ही जाहीर केले नाही.

जेव्हा परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात राहायचे नव्हते. त्यावेळी आम्ही केंद्राला रेल्वे सुरु करण्याची विनंती केली होती. मात्र तेव्हा ती मागणी मान्य झाली नाही. जेव्हा कामगाक चालत निघाले, तेव्हा केंद्र सरकारचे डोळे उघडले गेले.

४८१ ट्रेन राज्य सरकारने सोडलेल्या आहेत. राज्य सरकारने ८५ कोटी रुपये मजुरांच्या भाड्यापोटी दिले आहेत.

आम्ही रोज ८० ट्रेनची मागणी करत आहोत. मात्र आपल्याला ३५ ते ४० ट्रेन मिळत आहेत.

आपण मजुरांची व्यवस्थित नोंदणी केलेली आहे, सोय केलेली आहे. त्यामुळे हे मजूर त्यांच्या राज्यात गेल्यानंतर महाराष्ट्र सरकारची जय करत आहेत.

एसटीने सुद्धा फार महत्त्वाचे काम केले आहे. रस्त्यावरून चालत जाणाऱ्या लोकांना एसटीने पिकअप करुन त्यांना इच्छित स्थळी सोडले आहेत.

५ मे ते २३ मे पर्यंत एसटीच्या ३२ हजार फेऱ्या झालेल्या आहेत. ३ लाख ८० मजुरांना आपण एसटीने रेल्वे स्टेशन किंवा त्यांच्या राज्यात सोडले आहे. आतापर्यंत ७५ कोटी यासाठी खर्च केले आहेत.

परदेशातूनही आपण काही विद्यार्थ्यांना भारतात आणले आहेत. ७ जूनपर्यंत आणखी काही फ्लाईट्सने विद्यार्थी आपण आणणार आहोत.

पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी अस्वस्थ होऊ नये. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांचा देखील निर्णय लवकरात लवकर आपण घेणार आहोत.

महाराष्ट्राच्या अर्थचक्राचे काय होणार? या प्रश्नावर देखील आपण काम सुरु केले आहे. ५० हजार छोटे-मोठे उद्योग आपण सुरु केले आहेत.

जिथे ग्रीन झोन आहे, तिथे जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एसटीला परवानगी दिली आहे.

महाराष्ट्रातील जनतेला घरी येण्या-जाण्याची जी मागणी आहे. त्यावर देखील लवकरच निर्णय घेणार आहोत.

आंतरजिल्हा प्रवासाची काही प्रमाणात आपण मुभा दिली आहे. तरिही काही दिवसांत मोठ्या प्रमाणात परवानगी देण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.

नाट्यगृह, चित्रीकरणाला परवानगी देण्यासाठी देखील काही लोक माझ्याशी चर्चा करत आहेत. ग्रीन झोनमध्ये चित्रीकरणाला परवानगी देण्याविषयी विचार सुरु आहे.

आऊटडोअर खेळ सुरु करायला परवानगी कशी देता येईल? हे आपण पाहणार आहोत.

खरीप हंगामाबाबत आपण मंत्रिमंडळाची बैठक घेतली. यादरम्यान शेतीच्या बांधावरच शेतकऱ्यांना बि-बियाणे आणि खते कशी देता येतील. याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

कापूस खरेदी बाबत निर्णय घेत आहोत. दूध, मका आणि इतर अन्नधान्याबाबतही लवकरच निर्णय घेणार.

सिंधुदुर्गातील लॅबसाठी आपण परवानगी दिलेली आहे.

धान खरेदीसाठी देखील लवकरच निर्णय घेणार. कुणालाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.

कुणीही राजकारण करु नये. कुणी जर राजकारण करत असेल तरी आम्ही राजकारण करणार नाही.

कारण आमच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.

उणीवा खूप आहेत. केंद्राकडून जीएसटीचे पैसे मिळत नाहीत. सुरुवातीला पीपीई किट मिळाले नाहीत, रेल्वेचे पैसे अजून मिळत नाहीत. म्हणून काही आम्ही बोंब ठोकली नाही.

फक्त राजकारणासाठी राजकरण करणे योग्य नाही. माझ्या संस्कारात आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये राजकारण बसत नाही.

लॉकडाऊन उठणार की राहणार? याबद्दल आजच सांगणे कठीण आहे.

अचानक लॉकडाऊन करणे आणि ते अचानक उठवणे योग्य नाही.

कोरोनाचा व्हायरस जोरात गुणाकार करत आहे.

लॉकडाऊन अचानक उठवणे योग्य ठरणार नाही. हळुहळु आपण आयुष्याची गाडी पुर्वपदावर आणणार आहोत.

रिओपन करताना पाऊले मात्र आपल्याला जपून टाकावे लागणार आहे. मास्क घालूनच आपल्याला बाहेर पडावे लागणार आहे. सॅनिटायझरची बाटली जवळ बाळगावी लागणार आहे.

कोरोना नंतरचे जग कसे असेल? तर कोरोना नंतर आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे.

कोरोनाकडे आपल्याला पॉझिटिव्हली पाहावे लागणार आहे. कोरोना आपल्याला स्वच्छता, शारिरीक अंतर ठेवायला शिकवत आहे.

लॉकडाऊन हा शब्द विसरा.. हळुहळु काही गोष्टी उघडायला आपण परवानगी देणार आहोत. मात्र तिथे जर झुंबड उडाली तर लगेच त्या गोष्टी बंद करण्यात येतील.

जसे सहकार्य आजपर्यंत दिले आहे. तसेच सहकार्य यापुढे करत राहा.

CM Uddhav Balasaheb Thackeray addressing the State

CMOMaharashtra ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ಮೇ 24, 2020

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -