घरदेश-विदेशLok Sabha 2024 : कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी..., संजय राऊतांचा...

Lok Sabha 2024 : कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी…, संजय राऊतांचा निशाणा

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात 30पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीस सहज मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभांचा आणि प्रचाराचा बार फुसकाच ठरला. कोकणात प्रत्यक्ष मोदी उभे राहिले तरी, शिवसेनेचे उमेदवार जिंकतील. नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात किमान दोन लाख मतांनी पराभूत होतील, हे आताच नक्की झाले, असा निशाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी साधला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणात येऊन मोदी यांच्यावर टीका करून दाखवावी, असे थुकरट पद्धतीचे आव्हान भाजपा उमेदवार नारायण राणे देत आहेत. राणे आणि त्यांच्या मुलाचा तीन वेळा पराभव शिवसेनेने कोकणातच केला. मोदी यांच्या प्रेमात कोकणी जनता कधीच नव्हती. त्यामुळे राणे जेवढे ‘मोदी मोदी’ करतील तेवढा राणे यांना फटका बसेल, असा दावा खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरातून केला आहे.

- Advertisement -

मुसलमान आणि आंबेडकर विचारांचा मतदार पूर्णपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र आशादायी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार काही ठिकाणी उभे केले. 2019 प्रमाणे मुस्लिमांची साथ त्यांना मिळणार नाही. कारण देशभरातील मुस्लिम मतदार हा ‘इंडिया’ आघाडीच्या मागे उभा राहील आणि एमआयएमसारखे मुस्लिम मतांचे ठेकेदार या वावटळीत उडून जातील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांचे अस्तित्व या निवडणुकीने पूर्ण नष्ट केलेले दिसते. आठवले यांच्या चारोळ्याही त्यामुळे बंद झाल्या, असा टोला त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : …तेच मोदी मंगळसूत्रावर प्रवचने देतात, संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisement -

दक्षिण नगर मतदारसंघात नीलेश लंकेसारखा एक फाटका उमेदवार विखे-पाटील यांचा पराभव करेल, हे नक्की. नाशकात भुजबळ यांनी आधीच माघार घेतली. बारामतीत सुनेत्रा अजित पवार यांचे काहीच चालणार नाही. कल्याण-डोंबिवली मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे पराभवाच्या छायेत आहेत. सातारा ‘राजां’ना सोपा नाही आणि कोल्हापुरात शाहू महाराजांची निवडणूक एकतर्फी होत आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे कुटुंब पुन्हा शरद पवार यांच्या सोबत आले. त्यामुळे सोलापुरात प्रणिती शिंदे आणि ‘माढा’ मतदारसंघात राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते विजयी होतील. भारतीय जनता पक्षाला अशा अनेक मतदारसंघांत दारुण पराभवास सामोरे जावे लागेल, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : राज ठाकरे हे भाजपाचे महाराष्ट्रातील नवे डार्लिंग, संजय राऊतांची बोचरी टीका


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -