घरक्राइमOnline Food Delivery : ऑनलाइन पिझ्झाचा रिफंड पडला महागात ; मुंबईकर महिलेला...

Online Food Delivery : ऑनलाइन पिझ्झाचा रिफंड पडला महागात ; मुंबईकर महिलेला ११ लाखांचा गंडा

Subscribe

आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत त्याचप्रमाणे अनेकवेळा यूजर्सना सायबर गुन्हेगांरांच्या फसवणूकीला समोर जावे लागते. याच सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या एका महिलेला ऑनलाइन पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. मुंबईमध्ये अंधेरी भागात राहणाऱ्या वृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या सायबर गुन्हेगारीला बळी पडून या महिलेचे तब्बल 11 लाखांचे नुकसान झाले आहे.

हल्ली ऑनलाइन फूड डिलिव्हरी सर्रासपणे सुरु असते. ज्याप्रकारे आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत त्याचप्रमाणे अनेकवेळा यूजर्सना सायबर गुन्हेगांरांच्या फसवणूकीला समोर जावं लागतं. याच सायबर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या एका महिलेला ऑनलाइन पिझ्झा मागवणं महागात पडलं आहे. मुंबईमध्ये अंधेरी भागात राहणाऱ्या वृद्ध महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या सायबर गुन्हेगारीला बळी पडून या महिलेचे तब्बल 11 लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, या ऑनलाइन डिलिव्हरी दरम्यान महिलेच्या खात्यातून सुमारे 11 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सायबर गुन्हेगारांनी महिलेची बँक खाते आणि इतर गोष्टींबाबत संपूर्ण माहिती काढून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहिता च्या कलम 420 (फसवणूक) याशिवाय इतर संबंधित तरतुदींनुसार एफआयआर नोंदवली आहे.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण ?

पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्ध महिलेने पिझ्झा आणि इतर वस्तूंची ऑनलाइन ऑर्डर करताना या वृद्ध महिलेने चुकून जास्त पैसे दिले होते. मात्र, चुकून गेलेले पैसे तिला परत हवे होते. त्यामुळे तिने ऑनलाइन रिफंड मिळवण्यासाठी गुगलवर प्रोसेस समजून घेताना तिला एक नंबर सापडला. त्यावर त्या महिलेने तातडीने संपर्क केला असता. तुम्हाला पैसै परत मिळवण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करावा लागेल,असे सांगण्यात आले. या महिलेने गेल्या वर्षी जुलैमध्ये ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला होता. यावेळी पिझ्झाचे पैसे देताना फोनमधून चुकून त्यांच्याकडून 9999 रुपये गेले. तसेच, 29 ऑक्टोबर रोजी सुका मेवा खरेदी करताना ऑनलाईन माध्यमातून 1496 रुपयांचे नुकसान झाले होते.

या अॅपच्या आधारे त्या महिलेचे बँक डिटेल्स आणि पासवर्ड याची माहिती मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर 14 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2021 दरम्यान, या टपून बसलेल्या सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या बँक खात्यातून 11.78 लाख रुपये त्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले.

- Advertisement -

हेही वाचा – Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -