घरमनोरंजनLata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी...

Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली माहिती

Subscribe

लता मंगेशकर यांच्या गाण्याचा आज देशासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. सर्व वयोगटातील लोकं आजही आवडीने लता दीदींची गाणी गुणगुणताना दिसतात.

भारताच्या गाणसम्राधीनी लता मंगेशकर यांचे लाखो चाहते आज त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजूनही त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर यांच्या डॉक्टरांकडून सतत त्यांच्या प्रकृतीच्या अपडेट्स दिल्या जात आहेत.

लता मंगेशकर अद्यापही आयसीयूमध्येच

मिळालेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांचे डॉक्टर प्रतित समधनी यांनी सांगितले की, सध्या लता मंगेशकरयांच्यावर उपचार सुरु आहेत. लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. लता मंगेशकर यांनी त्यांच्या तब्येतीची जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची नाही. असं डॉक्टरांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lata Mangeshkar (@lata_mangeshkar)

- Advertisement -

मात्र लता मंगेशकर यांचे कुटुंबीय आणि चाहते त्यांच्या प्रकृतबाबत अधिक चिंतेत आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन घरी परताव्या यासाठी सर्वचजण प्रार्थना करत आहेत. ज्येष्ठ अनुभवी डॉक्टरांकडून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

92 वर्षीय गायिक लता मंगेशकर यांनी कोरोनासोबतचं न्यूमोनिया आजार झाला. अशा परिस्थितीत त्यांच्या वयाबाबत डॉक्टर सतर्क आहेत आणि त्यामुळेच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. अलीकडेच लता मंगेशकर यांच्य प्रकृतीबाबत अपडेट्स देत डॉक्टरांनी सांगितेल की, त्यांना 10 ते 12 दिवसात रुग्णालयात ठेवण्यात येईल, जेणेकरुन त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली चांगले उपचार होऊ शकतील.

लता मंगेशकर यांच्या गाण्याचा आज देशासह जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. सर्व वयोगटातील लोकं आजही आवडीने लता दीदींची गाणी गुणगुणताना दिसतात. त्यांच्या जादूही आवाजाने आज हजारो सुपरहिट गाणी सिनेसृष्टीला दिली. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीसाठी सर्वचं स्तरातून प्रार्थना केली जातेय.


corona vaccination : लसीच्या तुटवड्यावर आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण, केली ‘ही’ मागणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -