घरताज्या घडामोडीभूमिगत रस्त्याच्या कामामुळे चाकरमान्यांना मनस्ताप

भूमिगत रस्त्याच्या कामामुळे चाकरमान्यांना मनस्ताप

Subscribe

या ठिकाणी रस्ता सुरक्षिततेची तकलादू उपाययोजना करण्यात आली असल्याने अपघाताचाही धोका संभवत आहे.

पोलादपूरमधील वाहतुकीची कोंडी, अपघात, दरडी कोसळणे अशा एक ना अनेक कारणांमुळे चर्चेत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षित प्रवासासाठी केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्रालयाने चौपदरीकरणाचे काम हाती घेतले असले तरी ठेकेदाराच्या अजब पद्धतीच्या कामामुळे प्रवासाला अडथळा येत असून, गणेशोत्सवासाठी तळकोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास त्यामुळे कटकटीचा होण्याची चिन्हे आहेत. शहरातून जाणार्‍या या महामार्गावर श्री काळभैरव देवस्थान कमानीपासून पोलीस ठाण्यापर्यंत 30 फूट खोलगट भूमिगत मार्ग आहे. यावर एसटी बस स्थानक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ठेकेदार एल अँड टी कंपनीने खोदकाम केले असल्यामुळे उर्वरित अरूंद रस्त्यावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा गौरी-गणपतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाला कोकणी माणूस शहरातून हमखास कुटुंबियांसह खासगी, स्वतःच्या किंवा प्रवासी वाहनाने आणि दुचाकीने येत असतो. त्यामुळे महामार्गावर दरवर्षी १ सप्टेंबरपासून अव्याहत वर्दळ राहणार आहे.

अशावेळी येथील अरूंद रस्त्यावर वाहातुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच या ठिकाणी रस्ता सुरक्षिततेची तकलादू उपाययोजना करण्यात आली असल्याने अपघाताचाही धोका संभवत आहे. जर या ठिकाणी अपघात झाला तर वाहन खोदलेल्या खड्ड्यात पडणार असून, जीवितहानी होण्याची शक्यता आहे. तसेच दिशादर्शक किंवा सूचना फलक यापैकी काहीही नसल्यामुळे चाकरमान्याचा प्रवास जिकिरीचा ठरणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले असून, ठेकेदार कंपनीने तर आपण त्या गावचेच नसल्याची भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

गणपती सणाला दहा दिवस अगोदरपासून तळकोकणात चाकरमानी विविध वाहनांतून जातात. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहातुकीची कोंडी निर्माण होणार आहे. यदाकदाचित अरूंद रस्त्यावर अपघात घडू शकतो. महामार्ग बांधकाम विभागाने सर्विस रस्त्याचे काम केल्यास त्याचा एका मार्गाने वाहतुकीसाठी उपयोग होणार आहे,असे पोलादपूरचे माजी सभापती दिलीप भागवत यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा – नांदेडचे मराठा मूक आंदोलन हे भाजपप्रणीत आंदोलन – अशोक चव्हाण

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -