घरताज्या घडामोडीखोपोली नगरपरिषद हद्दीतील मिळगाव, धनगरवाडा रस्त्याची दुरावस्था

खोपोली नगरपरिषद हद्दीतील मिळगाव, धनगरवाडा रस्त्याची दुरावस्था

Subscribe

खोपोली नगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खालापूर तालुका व खोपोली शहरातही काही भागात नदी नाल्याला आलेल्या पूरामुळे नागरिकांच्या घरांचे,वस्तूंचे,शेतीचे नुकसान झाले आहे. याशिवाय, खोपोली नगरपरिषद हद्दीतील मिळगाव, धनगरवाडा गावचा रस्ता पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना येण्या-जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खोपोलीचे नगरसेवक नासिर पटेल यांनी याठिकाणी गावकर्‍यांना येण्या-जाण्यासाठी अनेकदा स्वखर्चाने कच्चा रस्ता बनविला आहे. त्यांनीही नगरपालिकेकडे या गावासाठी रस्ता बनविण्याची वारंवार मागणी केली, परंतू खोपोली नगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या गावातील कच्चा रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गावकर्‍यांचा खोपोली शहरात जाण्या-येण्याचा रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे गावातील एखादा नागरीक आजारी पडल्यास किंवा घरातील खरेदी करण्यास जायचे असेल तर, जवळपास ३ किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास हा नाले, ओढे आणि चिखलातून पार करावा लागत आहे. तरी नगरपालिका मुख्याधिकारी, नगराध्यक्षा यांनी तात्काळ लक्ष देऊन सदरील रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. खोपोली पालिका प्रशासन तसेच आमदार खासदार, अनुदान, निधी, प्रधानमंत्री सड़क योजना असे पर्याय असताना आम्हाला घराकडे जाणारा रस्ता हवा अशी मागणी करत कित्येक वर्ष गेले पण रस्त्या सारख्या हक्काच्या आमच्या मागणीकडे खोपोली नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Tokyo Olympics : ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानूने जल्लोषात स्वागत; क्रीडा मंत्र्यांनी केला सत्कार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -