घरताज्या घडामोडीMahashivratri 2022: यंदाच्या महाशिवरात्रीचा जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Mahashivratri 2022: यंदाच्या महाशिवरात्रीचा जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Subscribe

से मानले जाते की महाशिवरात्रीला शंकाराची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे आयुष्यात सुख समृद्धी येते. त्याचप्रमाणे या दिवशी शंकाराला रुद्राभिषेक केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.

Mahashivratri 2022: देशात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवात्री साजरी केली जाते. या दिवशी भगवना श्री शंकाराची पूजा केली जाते. असे मानले जाते की महाशिवरात्रीला शंकाराची उपासना केल्याने सौभाग्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे आयुष्यात सुख समृद्धी येते. त्याचप्रमाणे या दिवशी शंकाराला रुद्राभिषेक केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. यंदाची महाशिवरात्री कधी आहे? शुभ मुहूर्त आणि पूज विधी काय? जाणून घ्या.

कधी आहे महाशिवरात्री २०२२ ?

यंदाची म्हणजेच २०२२ची महाशिवरात्री मंगळवारी १ मार्च रोजी आहे. पहाटे ३:१६ वाजता महाशिवरात्रीला सुरुवात होऊन दुसऱ्या दिवशी चतुर्दशीला बुधवारी २ मार्च रोजी सकाळी १० वाजता संपणार आहे.

- Advertisement -

यंदा महाशिवरात्रीची पूजा चार प्रहरात केली जाणार आहे. चार प्रहरात पूजा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घ्या.

पहिला प्रहर – १ मार्च २०२२ संध्याकाळी ६:२१ ते ९:२७ वाजेपर्यंत

- Advertisement -

दुसरा प्रहर – १ मार्च २०२२ रात्री ९:२७ ते १२:३३ वाजेपर्यंत

तिसरा प्रहर – १ मार्च २०२२ दुपारी १२:३३ ते पहाटे ३:३९ पर्यंत

चौथा प्रहर – २ मार्च पहाटे ३:३९ ते ६:४५ वाजेपर्यंत

परायणाची वेळ – २ मार्च, बुधवार संध्याकाळी ६: ४५ नंतर

महाशिवरात्र २०२२ पूजा विधी

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान श्री शंकाराची पूजा केली जाते. त्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी ब्राम्ह मुहूर्तावर स्नान करा. त्यानंतर तुमच्या पूजा करण्याच्या स्थळी जाऊन पाण्याने भरलेल्या एका कलशाची स्थापना करा. तिथेच भगवान शिव आणि पार्वती यांची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यांची पूजा करा. पूजा करताना अक्षता, सुपारी, चंदन, लवंग, दूध, धोतरा, बेलपत्र, कमळ, इलायची या वस्तू भगवान शंकराला अर्पण करा. त्यानंतर शंकराची आरती म्हणून पूजा करा.


हेही वाचा – Valentines Week2022: यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला ‘या’ राशीच्या लोकांवर होणार प्रेमाचा वर्षाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -