घरताज्या घडामोडीप्रतिभावान लेखक रा. भि. जोशी

प्रतिभावान लेखक रा. भि. जोशी

Subscribe

रामचंद्र भिकाजी जोशी हे एक प्रतिभावान लेखक होते. त्यांचा जन्म १० जुलै १९०३ रोजी हैदराबाद येथे झाला. १९२१ मध्ये ते मॅट्रिक उत्तीर्ण झाले. त्यानंतर १८२१-२३ या काळात अमरावतीला डेप्युटी कमिशनर कार्यालयात त्यांनी कारकुनी केली. १९२३ मध्ये त्यांनी इंदूरच्या होळकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. कोलकात्याच्या संस्कृत असोसिएशनची काव्यतीर्थ परीक्षा ते १९२५ मध्ये उत्तीर्ण झाले. तसेच १९२७ मध्ये अलाहाबाद विद्यापीठाची पदवी परीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यानंतर नोकरी व पुढील शिक्षणासाठी ते मुंबईत आले.

१९३० मध्ये गिरगावातील आर्यन हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले, तर १९३१ ते ३२ या काळात विलेपार्ले येथील पार्ले टिळक विद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. १९४७ मध्ये मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्समध्ये रा. भि. जोशी प्राध्यापक म्हणून काम करू लागले. १९६१ पर्यंत ते याच महाविद्यालयात कार्यरत होते.

- Advertisement -

१९६१-१९६४ याकाळात ते महाड येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य होते. १९६८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. १९६८ ते १९७० याकाळात जोशी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाचे संचालक होते. १९७३ मध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक जबाबदार्‍यांमधून ते निवृत्त झाले. त्यानंतर ते पूर्णवेळ लिखाण करत असत. ‘कांचेचे कवच’ (१९९४), ‘वाटचाल’ (१९६१), ‘झम्मन आणि इतर कथा (१९५३), ‘साहित्य संवाद (१९६१)’, ‘उथव’(१९७८), ‘स्वर्गनगर’ (1९८६), ‘साठवणी’ (१९७९), ‘घाटशिळेवरि उभी’, ‘सोन्याचा उंबरठा’, ‘एकत्र गुंफून जीवितधागे’, ‘दीडवितीची दुनिया’, ‘प्रदक्षिणा’ ही पुस्तके त्यांनी लिहिली. अशा या प्रतिभावान लेखकाचे ६ नोव्हेंबर १९९१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -