घरअर्थजगतडाॅलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, एका डाॅलरसाठी मोजावे लागतील 'इतके' रुपये

डाॅलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण, एका डाॅलरसाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये

Subscribe

अमेरिकेतील महागाई ४० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. जून महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 14,000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे.

डॉलरच्या (dollar) तुलनेत रुपयाचे (rupee) विक्रमी घसरण झाली आहे (big fall in rupee against dollar). रुपया पहिल्यांदाच ७८ रुपयांच्या खाली गेला आहे. सोमवारी रुपया डाॅलरच्या तुलनेत 43 पैशांनी घसरून 78.28 वर आला आहे. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि अमेरिकेतील महागाईच्या आकडेवारीत झालेली वाढ यामुळे डाॅलरच्या तुलनेत रुपयाची इतकी मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 78.28 रुपये मोजावे लागतील.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि विदेशी गुंतवणूकदारांची शेअर बाजारात सातत्याने होत असलेली विक्री यामुळेही रुपयात घसरण पाहायला मिळत आहे. विशेषतः रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक काढून घेतल्याने रुपया 78.26 रुपयांच्या सर्वकालीन नीचांकी पातळीवर आला आहे. 23 फेब्रुवारी 2022 रोजी युद्ध सुरू होण्यापूर्वी रुपया डॉलरच्या तुलनेत 74.62 रुपयांवर होता. त्यानंतर रुपया 10 जून 2022 रोजी 77.82 रुपयांवर घसरला आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआयने अनेक नवीन पावले उचलली आहेत.

- Advertisement -

रुपयाची घसरण का झाली?

अमेरिकेतील महागाई ४० वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदरात मोठी वाढ केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी डाॅलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाली आहे.

- Advertisement -

विदेशी गुंतवणूकदारांकडून 14,000 कोटींची विक्री
विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. जून महिन्यात आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी 14,000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली आहे. त्याचबरोबर मे महिन्यातील किरकोळ महागाईची आकडेवारीही येणार आहे. याकडेही शेअर बाजाराचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -