घरअर्थजगतRule Change from 1st January 2024 : नवीन वर्षात गॅस सिलिंडरपासून ते...

Rule Change from 1st January 2024 : नवीन वर्षात गॅस सिलिंडरपासून ते हवाई प्रवासापर्यंत होणार बदल; वाचा सविस्तर

Subscribe

एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार 1 जानेवारीला एलपीजी गॅस सिलेंडर, सीएनजी आणि पीएनजी यांच्यासह इंधनाचे नवे दर जाहीर करणार आहे.

नवी दिल्ली : सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. पण नव्या वर्षात सर्वसामान्याच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण 1 जानेवारी 2024पासून बँक लॉकर, हवाई प्रवास, डिमॅट अकाऊंट, एलपीजी गॅस दरात वाढ, पासपोर्ट-व्हिसा नियम, बँक लॉकर, डिमॅड अकाऊंड आदी गोष्टीत नवीन वर्षात बदलणार आहेत.

नवीन वर्षात हवाई प्रवास महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एअरलाइन तिकिटावरील कर 20 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याबरोबर विमा प्रीमियम नवीन वर्षात महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

बँक लॉकर नियमात बदल

बँक लॉकरच्या नियमांमध्ये 1 जानेवारीपासून बदलणार होणार आहेत. यात बँक लॉकर धारकारला आणि लॉकर नूतनीकरण प्रक्रियात करारावर स्वाक्षरी करावी लागेत आणि हा करार 1 जानेवारीपासून लागू होणार आहे.

डिमॅट अकाऊंट

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने डीमॅट खात्यात नॉमिनी जोडण्याची 31 डिसेंबर 2023 शेवटची तारीख देण्यात आली होती. या तारखेनुसार खातेदारांना नॉमिनी जोडले नसतील, तरत्यांची खाती 1 जानेवारीपासून गोठवली जाऊ शकतात.

- Advertisement -

हेही वाचा – ICU Guidelines : तुमचा आप्त ICU मध्ये आहे का? असेल तर केंद्राची नवी नियमावली वाचाच…

आयकर परतावा

2022-23 या आर्थिक वर्षाचा आयटीआर भरण्याचा करदात्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत आयटीआर फाईल न केल्याने करदात्याला 1 जानेवारीपासून आयकर परतावा भरताना दंड द्यावा लागेल.

एलपीजी गॅस इंधन दरात वाढ

एलपीजी गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलसह इतर इंधन दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकार 1 जानेवारीला एलपीजी गॅस सिलेंडर, सीएनजी आणि पीएनजी यांच्यासह इंधनाचे नवे दर जाहीर करणार आहे.

यूपीआय अकाऊंट होणार बंद

यूपीआय अकाऊंटबाबत 1 जानेवारपासून नियमातही बदल होणार आहे. गेल्या वर्षापासून यूपीआय खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून बंद करण्यात येणार आहे.

हेही वाचा – लोकसभा निवडणुका Congressसाठी जाणार जड, जागावाटपावरून आघाडीत बिघाडीचे चित्र

सिमकार्ड नियमात बदल

मोबाईल सिमकार्डच्या नियमांत बदल होणार आहे. यामुळे टेलिकॉम कंपनीला ग्राहकांना कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी मंजुरी घ्यावी लागणार आहे. त्या व्यतिरिक्त केसवासी करणे हे दूरसंचार कंपन्यांना सरकारने अनिवार्य केले आहे. यामुळे 1 जानेवारीपासून नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे.

पासपोर्ट-व्हिसा नियम

परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीसाठी त्यांना अभ्यास संपण्यापूर्वी व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. जेणे करून विद्यार्थ्यी अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत कोणत्याही देशात वर्क व्हिसावर जाऊ शकणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -