घरअर्थजगतLPG Cylinder Price : व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत किरकोळ घट, घरगुतीचे दर 'जैसे...

LPG Cylinder Price : व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत किरकोळ घट, घरगुतीचे दर ‘जैसे थे’

Subscribe

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा एकदा कमी झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक गॅसचे दर जवळपास 40 रुपयांनी कमी करण्यात आले होते. त्यापाठोपाठ आज, सोमवारी पुन्हा व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. मात्र, यावेळी देखील घरगुती गॅस सिलिंडरच्या दर ‘जैसे थे’च ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा – Eknath Shinde : मुंबईचा स्वच्छता पॅटर्न चांदा ते बांदापर्यंत नेणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

- Advertisement -

गेल्या 22 डिसेंबर रोजी विविध शहरांनुसार व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 39 ते 44 रुपयांची घट करण्यात आली होती. 1 डिसेंबरपासून व्यावसायिक एलपीज सिलिंडरचे दर वाढवण्यात आले होते. त्यापूर्वी 16 नोव्हेंबरला 19 किलोचे व्यावसायिक LPG सिलिंडर 100 रूपयांनी महागले होते. तर, 14.2 किलो वजनाच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 30 ऑगस्ट 2023 रोजी घरगुती LPG सिलिंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्यात आली होती. तेव्हापासून त्या स्थिरच आहेत.

हेही वाचा – New Year : तळीरामांमुळे राज्य सरकार मालामाल! ‘इतक्या’ हजार कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

- Advertisement -

आता नव्या कपातीनुसार दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती केवळ 1.5 रुपयानी कमी झाल्या आहेत. महिन्याभरातील किमतींवर नजर टाकल्यास, व्यावसायिक गॅसची किंमत दिल्लीत 41 रुपये, कोलकात्यात 39 रुपये, मुंबईत 40.5 रुपये आणि चेन्नईत 44 रुपयांनी कमी झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीचा थेट फायदा रेस्टॉरंट आणि छोटे-मोठे हॉटेल चालक तसेच खाद्यविक्रेत्यांना मिळतो. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा – Sonia Gandhi : ‘माँ, यादें और मुरब्बा’; स्वयंपाकघरातील व्हिडीओमधून राहुल गांधींचा भाजपावर निशाणा

याशिवाय, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विमान इंधनाच्या किमतीत देखील कपात केली आहे. किलोमागे सुमारे 4162.50 रुपयांची घट करण्यात आली आहे. त्याची नवीन किंमत आजपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षांत हवाई प्रवास स्वस्त होऊ शकतो.

हेही वाचा – गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम घरे मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -