घरअर्थजगतझीरो बॅलन्स अकाउंटला मिळणार सर्व सुविधा

झीरो बॅलन्स अकाउंटला मिळणार सर्व सुविधा

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेनं बेसिक सेव्हिंग डिपॉझिट (BSBD) अकाउंट असलेल्यांना खास गिफ्ट दिले आहे. RBI एक गाइडलाइन घेऊन आली आहे. ते नियम सर्व प्रायमरी सहकारी बँका, सर्व राज्य किंवा केंद्रीय सहकारी बँकांना पाळावे लागतील. खातेधारकांना 1 सप्टेंबरपासून याचा फायदा होईल. BSBD अकाउंट हे झीरो बॅलन्स अकाउंट आहे. यात खातेधारक कितीही पैसे ठेवू शकतात. याला दंड लागत नाही. कुठल्याही बँकेत झीरो बॅलन्स अकाउंट उघडू शकता.

RBI नं BSBD अकाउंटशी संबंधित सेवांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय बँकांना BSBD अकाउंटमध्ये काही बेसिक सुविधा द्यायला सांगितले आहे. RBI ने आपल्या आदेशात म्हटलंय की BSBD अकाउंटला सर्वांसाठी सामान्य बँकिंग सर्विस समजली जाईल. ज्यांचे अकाउंटमध्ये अजिबात पैसे शिल्लक राहत नाहीत त्यांच्यासाठी हे खाते उपयोगी आहे. झीरो बॅलन्स खातेधारक आता बँकेच्या शाखेशिवाय एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशीनमध्ये पैसे जमा करू शकतात. खातेधारकाच्या खात्यात पैसे फंड ट्रान्सफर किंवा युपीआयच्या मदतीनं जमा होऊ शकतात. महिन्यातून कितीही वेळा ट्रान्झॅक्शन करता येते. लोक महिन्यात एटीएमसह चार वेळा पैसे काढू शकतात. खातेधारकांना एटीएमसह डेबिट कार्ड मिळेल. बँक अशा ग्राहकांना चेक बुकही देईल. बँक ग्राहकांना चेक बुक सुविधा दिल्यावर त्यांच्या खात्याचे रूपांतर बचत खात्यात करू शकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -