घरअर्थजगतबीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग सुविधा बंद

बीएसएनएलची अनलिमिटेड कॉलिंग सुविधा बंद

Subscribe

गेल्या काही काळापासून बीएसएनएल कंपनी तोट्यात आहे. त्या पार्श्वभूमीवर कंपनीने आता अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आता अनलिमिटेड कॉलिंगऐवजी दररोज केवळ 250 मिनिटं कॉलिंग करता येईल.

ज्या ग्राहकांकडे अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा असलेले प्लान्स आहेत त्या ग्राहकांना दररोज केवळ 250 मिनिटं किंवा 4 तास 10 मिनिट मोफत कॉलिंग करता येईल. त्यानंतर ग्राहकांना 1 पैसे प्रति सेकंद प्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. हे नियम सध्या काही खास प्लान्सवर लागू झाले आहेत, पण लवकरच सर्व प्रीपेड प्लान्सवर हे नियम लागू होणार आहेत. सध्या 186 रुपये, 429 रुपये, 666 रुपये आणि 1 हजार 699 रुपयांच्या प्री-पेड प्लानचा यात समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -