Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक: आरोपी म्हणाला मी नाही भूताने केली पत्नी व मुलांची  हत्या

धक्कादायक: आरोपी म्हणाला मी नाही भूताने केली पत्नी व मुलांची  हत्या

माझ्या शरीरात भूत आले आहे आणि त्याने मला सांगितले की

Related Story

- Advertisement -

बिहारमध्ये हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. बिहारमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारनमध्ये एका  बापाने धारदार शस्त्राने बायको आणि ५ मुलांचे पाय कापून त्यांची हत्या केली. ‘माझ्या शरीरात भूत आले आहे आणि त्याने मला सांगितले की, जो समोर येईल त्याला मारून टाक’ असे आरोपी सांगू लागला. या घटनेमुळे परिसरा खळबळ उडाली आहे.

बिहारच्या भगवान पोलीस स्टेशनच्या परिरात असणाऱ्याबलहा  अली मर्दनपुर येथे ही घटना घडली आहे.बलहा  येथे राहणाऱ्या एका निर्दयी बापाने आपली बायको आणि ५ मुलांचे पाय कापून त्यांची हत्या केली. आरोपीला २ मुली आणि ३ मुलगे आहेत. या घटनेत बायको आणि एक मुलगी सोडल्यास बाकी ४ मुलांचा मृत्यू झाला. आरोपीची बायको आणि एक मुलगी या हत्येत गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधेश चौधरी असं आरोपीचे नाव आहे. बिहारच्या बलहा गावातील तो स्थायिक होता. या घटनेतच्या आधी अवधेश आणि त्याच्या बायकोचे  काही कारणांवरून भांडण झाले होते. हाच राग डोक्यात ठेवून अवधेश ने आपल्या बायकोसह ५ मुलांचे धारदार हत्याराने पाय कापून त्यांची हत्या केली.

आरोपी अवधेशने सांगितल्यानुसार, मी घराबाहेर जाताच माझ्या अंगात भूताने प्रवेश केला. त्या भूताने मला समोर येईल त्याला मारून टाक असे सांगितले. त्यानंतर माझ्या घरचे माझ्या समोर आले. भूताने घराच्याचे पाय कापून टाकल. त्यामुळे मी नाही तर भूताने माझ्या बायकोची आणि माझ्या ५ मुलांची हत्या केली, असे तो सांगत होता.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी निर्दयी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली त्यातून आरोपीची मानसिक स्थिती खराब असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – धक्कादायक: लाटण्याने मारून बायकोने केली नवऱ्याची हत्या, प्रियकराने दिली साथ

- Advertisement -