घरक्राइमCrime News: बर्गर, गर्लफ्रेंड अन् मित्राची हत्या...; नेमके काय आणि कुठे घडले?

Crime News: बर्गर, गर्लफ्रेंड अन् मित्राची हत्या…; नेमके काय आणि कुठे घडले?

Subscribe

गर्लफ्रेंन्डसाठी आणलेला बर्गर मित्राने खाल्ला. याचा राग आल्याने त्याने आपल्या मित्रावर गोळ्या झाडून त्याला संपवलं. अशी धक्कादायक घटना पाकिस्तानातील कराची येथून समोर आली आहे.

कराची: गर्लफ्रेंन्डसाठी आणलेला बर्गर मित्राने खाल्ला. याचा राग आल्याने त्याने आपल्या मित्रावर गोळ्या झाडून त्याला संपवलं. अशी धक्कादायक घटना पाकिस्तानातील कराची येथून समोर आली आहे. कराचीमध्ये, एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने आपल्या गर्लफ्रेन्डसाठी ऑर्डर केलेला अर्धा बर्गर मित्राने खाल्ल्ला म्हणून 17 वर्षीय मित्राची हत्या केली आहे. (Crime News a boy kills friend a bite of girlfriend burger in Pakistan)

कराचीच्या डिफेन्स हाऊसिंग अथॉरिटी परिसरात ही घटना घडली. खून झालेला मुलगा न्यायाधीशाचा मुलगा होता. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे.

- Advertisement -

नेमकं घडलं काय? 

या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्त पोलीस अधीक्षक (एसएसपी) नजीर अहमद मीर बहार यांचा मुलगा दानियल मीर बहार याने कराची जिल्हा दक्षिण सत्र न्यायाधीश जावेद केरियो यांचा मुलगा अली केरियो यालाही घरी बोलावले. नंतर त्याने गर्लफ्रेंड शाजियालाही बोलावले. यावेळी डॅनियलने मित्र आसी किरियो आणि त्याचा भाऊ अहमर यांनाही आमंत्रित केले होते. यानंतर आरोपीने स्वतःसाठी आणि प्रेयसी शाजियासाठी दोन जिंजर बर्गर मागवले होते. परंतु त्या बर्गरचा अलीने एक घास खाल्ला आणि त्या दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली.

यानंतर दोघांमधील भांडण खूपच वाढले. हा वाद इतका टोकाला गेला की आरोपी दानियाल नजीरने त्याच्या घराच्या रक्षकाची रायफल हिसकावून घेतली आणि त्याचाच मित्र अली किरिओ याच्यावर गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी तपास पूर्ण करून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला, ज्यामध्ये या गुन्ह्यासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाला जबाबदार धरण्यात आले. एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, आरोपी दानियाल नजीरला सध्या ताब्यात घेण्यात आले असून, तो न्यायालयात खटल्याच्या प्रतीक्षेत आहे.

(हेही वाचा: Raigad Alibaug Crime News : चक्री जुगार अड्ड्यांवर कुणाचा वरदहस्त?)


Edited By- Prajakta Parab

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -