घरक्राइमCrime: अल्पवयीन मुलीचा नको तसा व्हिडीओ बनवून केला व्हायरल; विद्यार्थिनीची आत्महत्या

Crime: अल्पवयीन मुलीचा नको तसा व्हिडीओ बनवून केला व्हायरल; विद्यार्थिनीची आत्महत्या

Subscribe

एका अल्पवयीन कॉलेजमधील विद्यार्थीनीशी गैरवर्तन करत, काही मुलांनी तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. इतकचं नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. आपली बदनामी होईल, म्हणून या विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवनं संपवलं आहे.

लातूर: राज्यातील मुलींबाबतच्या अत्याचाराच्या घटना काही थांबताना दिसत नाही. लातूरमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन कॉलेजमधील विद्यार्थीनीशी गैरवर्तन करत, काही मुलांनी तिचा आक्षेपार्ह व्हिडीओ तयार केला. इतकचं नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरलही केला. आपली बदनामी होईल, म्हणून या विद्यार्थीनीने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवनं संपवलं आहे. (Crime Unwanted video of minor girl made viral Suicide of a student in Latur Chakur)

समोर आलेल्या माहितीनुसार, लातूरमधील चाकूर येथे एका कॉलेजमध्ये 16 वर्षीय विद्यार्थीनी 11 वी मध्ये शिक्षण घेत होती. दरम्यान, एका दिवशी विद्यार्थीनी घराकडे जात असताना तिचा आरोपींनी पाठलाग केला. तसंच, तिला रस्त्यात अडवून तिच्याशी गैरवर्तन केलं आणि त्याचा एक व्हिडीओ बनवला तो व्हिडीओ सोशल मीडिया माध्यमांवर अपलोड केला. नको तो व्हिडीओ सोशल मीडियावर गेल्यावर आपली बदनामी होईल, या भीतीने विद्यार्थीनीने विष घेऊन, आत्महत्या केली. आता या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

दोन आरोपी अटकेत, तीन फरार

मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच चाकूर पोलिसांनी दोघांना अटकदेखील केली आहे. तर तीन आरोपी अजूनही फरार आहेत, या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

बीड तालुक्यातील धक्कादायक घटना

लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध, तुझ्या नवऱ्याला सांगून संसार उद्ध्वस्त करेन, अशी धमकी देत नराधमाने 35 वर्षीय विवाहितेवर सलग 7 वर्षे अत्याचार केला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

प्रमोद मुंजा पराड असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव आहे. तर पीडित 35 वर्षीय विवाहितेचे लग्न झालेलं असून ती बीडच्या माजलगाव तालुक्यात राहते.

(हेही वाचा: Amol Kolhe यांना आव्हान दिल्यानंतर अजित पवार सकाळीच शिरुर मतदारसंघ दौऱ्यावर; म्हणाले…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -