घरक्राइमCrime News : झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा डीआरआयकडून पर्दाफाश; कोट्यवधीचे चलन जप्त

Crime News : झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा डीआरआयकडून पर्दाफाश; कोट्यवधीचे चलन जप्त

Subscribe

झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश करून चार आरोपींना अटक केली.

मुंबई : झव्हेरी बाजारातील सोने तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश करून चार आरोपींना अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही स्थानिक न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या टोळीकडून आफ्रिकेतून आणलेल्या सोन्यावर विदेशी खुणा काढून ते वितळवून त्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण कारवाईत अधिकार्‍यांनी 9 किलो 670 ग्रॅम वजनाचे सोने, 18 किलो 480 ग्रॅम वजनाची चांदी, 1 कोटी 92 लाखांचे भारतीय आणि 10 कोटी 48 लाख रुपयांचे विदेशी चलनाचा साठा जप्त केला आहे. या कामासाठी कॅरिअरची मदत घेतली जात होती, त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन जात असल्याचे अधिकार्‍याने सांगितले. (Gold smuggling in jewelery market exposed by DRI)

गेल्या काही दिवसांपासून विदेशातून मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होत असून या तस्करीमागे काही आफ्रिकन नागरिक सक्रिय असल्याची माहिती मुंबई युनिटच्या डीआआयच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. त्यामुळे या अधिकार्‍यांनी त्याची शहानिशा सुरू केली. चौकशीदरम्यान एका संशयिताला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. तो आफ्रिकन नागरिकांसाठी कॅरिअर म्हणजे वाहक म्हणून काम करत होता. या आरोपींकडून सोने घेतल्यानंतर तो सोन्यावरील विदेशी खुणा काढून त्यावर प्रक्रिया करत होता. त्यानंतर ते सोने त्यांच्या सांगण्यावरून संबंधित व्यक्तीला दिले जात होते. त्यामुळे या अधिकार्‍यांनी कामगाराची भरती करणार्‍या कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेथून या अधिकार्‍यांनी 10 कोटी 48 लाख रुपयांचे विदेशी चन जप्त केले. सोने खरेदीसाठी ही रक्कम तिथे पाठविण्यात आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Crime News : मुलाच्या प्रवेशासाठी घेतलेल्या दागिन्यांवर कर्ज काढून फसवणूक; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

या कार्यालयातून मिळालेल्या माहितीवरून अधिकार्‍यांनी सोने खरेदी करणार्‍या व्यापार्‍याच्या कार्यालयात छापा टाकला. मात्र त्यापूर्वीच संबंधित व्यापारी तेथून पळून गेला होता. या कार्यालयातून अधिकार्‍यांनी 351 ग्रॅम वजनाचे विदेशी सोन्याचे तुकडे, 1818 ग्रॅम वजनाचे चांदी आणि 1 कोटी 92 लाख रुपयांचे भारतीय चलन जप्त केले. याच दरम्यान सोने तस्करीतील काहीजण झव्हेरी बाजारातील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती अधिकार्‍यांना मिळाली. या माहितीनंतर अधिकार्‍यांनी चारजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

- Advertisement -

त्यात कॅरिअरसह सोने वितवळणार्‍या व्यक्तींचा समावेश होता. या कामासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन दिले जात होते. ही टोळी विदेशातून सोने तस्करी करणार्‍या टोळीसाठी काम करत होती. त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल होताच या सर्व आरोपींना अधिकार्‍यांनी अटक केली आहे. अटकेनंतर चारही आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा – Baramati: लाइटबिल जास्त आल्याने राग अनावर; महवितरणच्या महिला कर्मचाऱ्याचा घेतला जीव

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -