घरमहाराष्ट्रKalyan Firing : बंदुकीचं लायसन्स होणार रद्द? ठाणे गोळीबार घटनेनंतर पोलिसांचा मोठा...

Kalyan Firing : बंदुकीचं लायसन्स होणार रद्द? ठाणे गोळीबार घटनेनंतर पोलिसांचा मोठा निर्णय

Subscribe

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेतील ( शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जागेवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी दोघांना उल्हासनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर खळबळ उडाली. राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पोलिसांना ज्यांच्याकडे बंदुकीचे लायसन्स आहे त्याची पडताळणी करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. (Kalyan Firing License will be cancelled After the Thane shooting incident a big decision by the police regarding licenses)

राज्य सरकारने ठाणे पोलिसांना याबाबत सूचना दिल्या आहेत. ठाण्यात आतापर्यंत जवळपास 4 हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राजकारणी, बिल्डर आणि समाजसेवक हे लोक बंदुकीचं लायसन्स मिळवण्यात अग्रस्थानी आहेत. गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर आता ठाणे पोलीस जिल्ह्यातील सर्वच लायसन्सची पडताळणी करणार आहेत, जर आवश्यकता नसेल तर लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आज पुन्हा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. खासदार श्रीकांत शिंदे हे गोळीबाराच्या घटनेनंतर महेश गायकवाड यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असताना रूग्णालयातच बसून होते.

… तर लायलन्ल होणार रद्द

पोलीस पडताळणीत आता बंदुकीचे लायसन्स का हवे? ती कारणं जाणून घेतली जाणार आहेत. त्यानंतर आवश्यकता नसलेल्यांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे आता कोणालाही बंदूक बाळगता येणार नाही.

- Advertisement -

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा…

महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होता आहे. तसंच, राहुल पाटील यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

(हेही वाचा: Shambhuraj Desai : गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप तथ्यहीन- शंभूराज देसाई)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -