घरक्राइमNoida Gang Rape : गुंडांकडून शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना...

Noida Gang Rape : गुंडांकडून शॉपिंग मॉलच्या पार्किंगमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; तिघांना अटक, दोन फरार

Subscribe

नोएडा : 1 नोव्हेंबरच्या रात्री IIT BHU मध्ये तीन तरुणांनी बंदुकीच्या धाकावर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. यानंतर आता नोएडामध्येही 19 जून 2023 रोजी बंदुकीच्या धाकावर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. नोकरी देण्याचे आमिष दाखवून तरुणीवर बंदुकीच्या धाकावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सेक्टर-39 पोलीस ठाण्यात सारिया आणि भंगार माफियांसह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन अद्यापही फरार आहेत. (Noida Gang Rape Girl gang raped in shopping mall parking lot Three arrested two absconding)

गौतम बुद्ध नगर येथील रहिवासी असलेल्या तरुणीने सेक्टर-39 पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार तरुणी नोकरीच्या शोधात होती. यादरम्यान तिची ओळख राजकुमार नावाच्या व्यक्तीशी झाली. नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने आरोपी राजकुमारने तरुणीला तिच्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांसह बरौला गावात येण्यास सांगितले. तिथे राजकुमार आणि त्याचा साथीदार मेहेमी यांच्याशी तिची ओळख झाली. तिथे दोघांनी तक्रारदार तरुणीला रवी हे आमचे सर असल्याचे सांगितले. आम्ही तुमची त्यांच्याशी ओळख करून देऊ आणि ते तुम्हाला नोकरी मिळवून देतील, अशी महिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – Dawood Ibrahim: दाऊद इब्राहिमने बालपण घालवलेलं घर लिलावात; ‘या’ मालमत्तांवरही टाच

नोएडाच्या गार्डन गॅलेरिया मॉलच्या पार्किंगमध्ये केले गैरकृत्य 

पीडित तरुणीने राजकुमार आणि मेहेमी या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. 19 जून रोजी राजकुमार आणि मेहेमीने तरुणीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने गार्डन गॅलेरिया शॉपिंग मॉलमध्ये नेले. पीडित तरुमी गार्डन गॅलेरिया मॉलच्या पार्किंगमध्ये राजकुमार आणि मेहेमीसोबत कारमध्ये गेली. रवी, आझाद आणि विकास हे तिन्ही आरोपी तिथे आधीच उभे होते. त्यांच्या प्रत्येकाच्या हातात शस्त्रे होती.

- Advertisement -

मुलीला जीवे मारण्याची दिली धमकी 

आरोपी रवीने तक्रारदार तरुणीला गाडीत बसवून तिचे कपडे काढले आणि चुकीचे कृत्य करत या घटनेचा व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. तरुणीने विरोध केला असता आरोपीने शक्तिशाली आणि श्रीमंत व्यक्ती असल्याचे सांगत कोणालाही घाबरत नसल्याचे सांगितले. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतरही आरोपींनी तरुणीला ब्लॅकमेल करत तिला त्रास देणे थांबवले नाही.

हेही वाचा – Rape Case : वाराणसीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; Congress कडून भाजपला घेरण्याचा प्रयत्न

तीन आरोपींना अटक, दोन फरार

डीसीपी हरीश चंदर यांनी सांगितले की, आरोपी पेशेवर गुंड असल्याने पीडित तरुणी एफआयआर आणि पोलिसांसमोर येण्यास घाबरत होती. परंतु आरोपींच्या सततच्या ब्लॅकमेलला कंटाळून महिलेने अखेर 30 डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांचे पथक तयार करून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. 31 डिसेंबर रोजी रात्री 11 च्या सुमारास पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कारमधून आरोपी  पीडित तरुणीला भेटण्यास आले. यावेळी पोलिसांनी कारला घेरले आणि आरोपींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. पोलिसांनी राजकुमार, आझाद आणि विकास या तीन आरोपींना अटक केली असून रवी आणि मेहेमी हे दोघे अद्यापही फरार आहेत. पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे, अशी माहिती हरीश चंदर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -