घरक्राइमPune : प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी किसळवाणा प्रकार; समोस्यात कंडोमसह इतर गोष्टी...

Pune : प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचा काटा काढण्यासाठी किसळवाणा प्रकार; समोस्यात कंडोमसह इतर गोष्टी भरल्या

Subscribe

पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले होते. ते परत आपल्याला मिळावे यासाठी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोस्यात कंडोम टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. 

पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीसंदर्भातील बातम्या समोर येत आहे. वारंवार गोळीबार, कोयत्याचा वापर करत गुंडगिरी अशा घटनांमुळे पुणे शहर हे गुन्हेगारीत केंद्रस्थानी आहे. अशातच आता पुन्हा एकदा पुण्यातून किळसवाणा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका नामांकित कंपनीच्या कॅन्टीनचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराला मिळाले होते. ते परत आपल्याला मिळावे यासाठी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये समोस्यात कंडोम टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका कामगाराला अटक करण्यात आली आहे. (Pune Crime is a sleazy way to get rid of a rival contractor Samosas were stuffed with condoms and other things)

मिळालेल्या माहितीनुसार, औंध येथील एक कंपनी खाद्यपदार्थ पुरवण्याचे कंत्राट घेते. ही कंपनी पिंपरी चिंचवडमधील एका नामांकित कंपनीचं कॅन्टीन चालवायची. या कंपनीने सुरुवातीला एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीला कंत्राट दिले होता. मात्र एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीने पुरविलेल्या समोस्यामध्ये प्रथमोपचार पट्टी आढळून आल्यामुळे त्यांच्यासोबत समोसा पुरविण्याचे कंत्राट रद्द करण्यात आले आणि त्यांच्याजागी मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीसोबत करार करण्यात आला. ही बाब एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीच्या मालकांना समजताच त्यांनी कट रचला.

- Advertisement -

हेही वाचा – Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या

रहीम शेख, अझर शेख आणि मजहर शेख या एसआरएस इंटरप्रायजेस कंपनीच्या तिन्ही मालकांनी आपल्या कटात फिरोज शेख आणि विक्की शेख या कामगारांना सहभागी करून घेतले. या दोन्ही कामगारांना विश्वासात घेऊन आरोपी मालकांनी त्यांना मनोहर इंटरप्रायजेस या कंपनीत कामाला पाठवले. या कामगारांनी एसआरएस कंपनी मालकांनी सांगितल्याप्रमाणे समोस्यात कंडोम, तंबाखूजन्य पदार्थ आणि दगडं भरले. हे समोसे नामांकित कंपनीच्या कॅन्टीनमध्ये पोहचले. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी जेव्हा हे समोसे खाल्ले तेव्हा हा धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला. याप्रकरणी औंध येथील खाद्य पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरने पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानुसार चिखली पोलिसांनी फिरोज या कामगाराला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -