घरदेश-विदेशLok Sabha : उमेदवारांना सर्व संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा...

Lok Sabha : उमेदवारांना सर्व संपत्ती जाहीर करण्याची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर येत्या काही दिवसात पहिल्या टप्प्यातील निवडणुका होणार आहेत. अशातच सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या किंवा त्यांच्या आश्रितांच्या मालकीच्या सर्व जंगम मालमत्ता जाहीर करणे आवश्यक नाही. जोपर्यंत त्याची किंमत जास्त किंवा ऐशो आरामाच्या जीवनशैलीशी संबंधित नसेल. 2019 च्या अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेजू येथील अपक्ष आमदार कारिखो क्री यांची निवडणूक कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. (Lok Sabha Election 2024 candidates need not declare all assets An important judgment of the Supreme Court)

याचिकेत कारिखो क्री यांच्या विरोधकांनी दावा केला होता की, आमदाराने उमेदवारी दाखल करताना पत्नी आणि मुलाच्या मालकीची तीन वाहनांचा उल्लेख केलेला नाही. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी कारिखो क्रि यांनी वाहन भेट म्हणून दिले होते किंवा विकत घेतले होते, यासंदर्भातही कोणताही खुलासा केलेला नाही. कारिखो क्री यांच्याकडे किती मालमत्ता आहे हे मतदारांना जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे कारिखो क्री यांनी त्याच्या मालमत्तेचे सर्व तपशील उघड करायला हवेत. मात्र याचिकाकर्त्याचा हा युक्तिवादही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Arvind Kejriwal : केजरीवालांकडून कट रचून दिल्ली मद्य धोरणाला परवानगी; हायकोर्टाने फेटाळली याचिका

आज पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मतदाराला उमेदवाराच्या प्रत्येक मालमत्तेबद्दल जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नाही. निवडणूक उमेदवाराला त्याच्या उमेदवारीशी संबंधित नसलेल्या बाबींच्या बाबतीत गोपनीयतेचा अधिकार आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत. यासोबतच त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयाचा तो आदेशही रद्द केला, ज्यामध्ये कारिखो क्रीची निवडणूक रद्दबातल ठरवण्यात आली होती.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मतदारांची छाननी होण्यासाठी उमेदवाराने आपला जीव धोक्यात घालावा, असा व्यापक प्रस्ताव आम्ही स्वीकारू शकत नाही. मतदाराला चिंता नसलेल्या किंवा त्याच्याशी अप्रासंगिक असलेल्या बाबींमध्ये उमेदवाराच्या गोपनीयतेचा अधिकार टिकून राहील. परंतु उमेदवारांचा त्यांच्या उमेदवारीवर मोठा प्रभाव असल्यास त्याला त्यांची मालमत्ता उघड करावी लागेल. उमेदवाराने कपडे, बुट, भांडी, स्टेशनरी, फर्निचर यासारख्या जंगम मालमत्तेतील प्रत्येक वस्तू घोषित करणे आवश्यक नाही, जोपर्यंत या वस्तू मोठी संपत्ती बनण्यासाठी पुरेशा मौल्यवान नसतील.  

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -